शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

'राजपूत नसते तर झुकले असते का, हा कोणता जातीवाद?' विवेक अग्निहोत्रींचा सिसोदियांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 15:17 IST

अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सीबीआयच्या निशाण्यावर आहेत.

नवी दिल्ली: अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) सीबीआयच्या (CBI) निशाण्यावर आहेत. मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयच्या छापेमारीनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी स्वतःच्या जातीवरुन केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सिसोदियांच्या या वक्तव्यावर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 

विवेक अग्निहोत्री यांनी मनीष सिसोदिया यांना ट्विटद्वारे विचारले आहे की, हा कसला जातीवाद आहे? विवेक अग्निहोत्री यांनी सिसोदियांचे ट्विट रिट्विट करताना लिहिले की, "हा कोणत्या प्रकारचा जातिवाद आहे? मनीष सिसोदिया राजपूत नसते तर झुकले असते. म्हणजे दिल्लीत राहणारे ब्राह्मण, यादव, गुज्जर, जाट, शीख वगैरे सगळे झुकतात ? मुस्लिम, ख्रिश्चन, दलित ही सगळी झुकणारी जमात आहे का?' असा सवाल अग्निहोत्री यांनी उपस्थित केला.

विवेक अग्निहोत्रींचे ट्विट... 

मनीष सिसोदिया यांचे भाजपला प्रत्युत्तरअबकारी धोरण घोटाळ्यामुळे आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष आमने-सामने आले आहेत. मनीष सिसोदिया यांनी सोमवारी त्यांच्या एका ट्विटद्वारे दावा केला की, त्यांना भाजपकडून आम आदमी पार्टीत फूट पाडून भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. ते भाजपमध्ये आले, तर त्यांच्यावरील खटले मागे घेतले जातील. मात्र, भाजपने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

सिसोदिया यांनी भाजपला दिलेल्या प्रत्युत्तरात लिहिले की, “माझे भाजपला उत्तर- मी राजपूत आहे, महाराणा प्रतापांचा वंशज आहे. मी माझे शीर छाटून घेऊन, पण भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे काही करायचे ते करा."

सिसोदिया आरोपी नंबर एकअबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. सीबीआयचा हा छापा अनेक तास चालला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी मनीष सिसोदिया यांचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतले. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने मनीष सिसोदिया यांना नंबर वन आरोपी बनवले आहे. 

टॅग्स :AAPआपCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArvind Kejriwalअरविंद केजरीवाल