विठ्ठलाला दीड कोटीच्या देणग्या
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30
आषाढी यात्रा : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २.२१ कोटींचे उत्पन्न

विठ्ठलाला दीड कोटीच्या देणग्या
आ ाढी यात्रा : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २.२१ कोटींचे उत्पन्नसचिन कांबळे / सुनील शिवशरण पंढरपूर : पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले.यंदा १२ लाख भाविकांनी आषाढीला पंढरीत हजेरी लावली. आषाढी यात्रेत आलेल्या भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर ३२ लाख ६७ हजार ६३६ रुपयांचे तर रुक्मिणी मातेच्या पायावर ६ लाख ४० हजार ३८१ रुपयांचे दान अर्पण केले. तसेच अन्नछत्रासाठी ८३ हजारांची देणगी तर विठ्ठल-रुक्मिणीला १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ देणगी दिली आहे. विविध वस्तू व साहित्य विक्रीतून मंदिर समितीला ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले.विठ्ठल-रुक्मिणीला दान व देणगीतून १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपये व प्रसाद व वस्तूंच्या विक्रीतून ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी मंदिर समितीला २ कोटी २१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.कोट -विठ्ठल-रुक्मिणी मातेला मागील वर्षी २ कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी २ कोटी २१ लाख ८७ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षी ८ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे.- शिवाजी कादबानेकार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूऱचौकटदहा दिवसांत रेल्वेला कोटीचा फायदाआषाढी यात्रा कालावधीत विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येणार्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वे विभागाने जादा गाड्यांच्या १०२ फेर्या केल्या. यातून २ लाख १९ हजार भाविकांनी प्रवास केल्याने रेल्वेला १ कोटी २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. केवळ दहा दिवसांच्या काळात रेल्वेला हे वाढते उत्पन्न मिळाले.