शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 11:59 AM

चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.

वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारताचा चीनशी तणाव वाढत आहे. त्याचदरम्यान भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले की, भारताने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर पर्याप्त सैन्य तैनात केलं आहे. लेह-लडाखला भेट देणारे जनरल नरवणे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बातचीत केली आहे.  ते म्हणाले, चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.भारत सर्व परिस्थितीला तोंड देण्यास सक्षमलष्कर प्रमुख म्हणतात, 'मी लेहला पोहोचलो आणि बर्‍याच ठिकाणी भेट दिली. मी अधिकारी व जेसीओशी बोललो व तयारीचा आढावा घेतला. जवानांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. ते म्हणाले, 'एलएसीची परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा विचार करता आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून जवान तैनात केले आहेत, जेणेकरून आपल्या सुरक्षिततेवर आणि अखंडतेवर परिणाम होणार नाही.जगातील सर्वात हुशार सैन्य: लष्कर प्रमुखनरवणे यांनी पुन्हा यावर जोर दिला की, एलएसीवर तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. ते म्हणाले, 'ते खूप प्रेरित झाले आहेत. त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि ते समोर उद्भवणार्‍या सर्व प्रकारच्या परिस्थितींचा सामना करण्यास तयार आहेत. आमचे अधिकारी आणि जवान हे जगातील सर्वात हुशार आहेत आणि त्याचा सैन्यच नव्हे तर देशाला अभिमान आहे. लष्कर प्रमुख गुरुवारी चुशुल सेक्टर येथे पोहोचले आणि तेथील संरक्षण तयारीचा आढावा घेतला आणि ते आज दिल्लीत परत येणार आहेत.एलएसीवर दोन्ही देश आमनेसामने आहेतपूर्व लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये चीननं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे. चिनी सैन्याच्या कोणत्याही धाडसी प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपल्या मोर्चावर बरेच सैन्य लावले आहे. या भागात दोन्ही देशांनी सैन्य, टाक्या, शस्त्रे वाहने आणि हॉविझर्स तोफा मोठ्या संख्येने तैनात केल्या आहेत.एअर चीफ यांनीही घेतला तयारीचा आढावा तणावाच्या दरम्यान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी हशिमारा (Hashimara)सह लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरच्या लष्करी विमानतळांची पाहणी केली.चर्चेचा दरवाजा अद्यापही खुलाLACवरील अत्यंत कठोर परिस्थितीशी दोन्ही देशांनी लष्करी संभाषणाचा मार्ग खुला केला आहे. ब्रिगेडियर स्तरावरील चर्चेची चौथी फेरी गुरुवारी चुशुल-मोल्डो सीमास्थळावर झाली. यावेळी देखील संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव