शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

VIDEO: डिस्चार्ज मिळताच विश्वासकुमारने भावाच्या मृतदेहाला दिला खांदा; दोघेही जात होते लंडनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:33 IST

अहमदाबाद विमान अपघातात जखमी झालेले विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली. विमानातील प्रवाशांसह २७० जणांचा या अपघातात भीषण मृत्यू झाला. मात्र या अपघातातून विमानातील केवळ एकच प्रवासी वाचला आहे. अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले. विमानातील उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या मृतांमध्ये विश्वास कुमार यांचा भाऊ देखील होता. रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर विश्वास कुमार यांनी भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला. यावेळी विश्वास कुमार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. एअर इंडियाच्या एआय १७१ बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानात लंडनला जाणाऱ्या २४२ जणांपैकी फक्त एक प्रवासी वाचला होता ४० वर्षीय ब्रिटिश-भारतीय नागरिक रमेश ११ए क्रमांकाच्या सीटवर बसला होते. विश्वास कुमार या भयानक अपघातातून वाचले तर त्यांचा धाकटा भाऊ अजय कुमार रमेश यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते.

विश्वास कुमार यांनी सांगितले होते की उड्डाणानंतर ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि विमान कोसळले. सर्व काही इतक्या लवकर घडले की काहीही समजले नाही. विश्वास कुमार हे ११ ए या आपत्कालीन एक्झिटजवळ बसले होते. विमान कोसळ्यानंतर त्यातून बाहेर पडत विश्वास कुमार यांनी आपला जीव गमावला होता. विश्वास कुमार यांचा भाऊ अजय ११ जे सीटवर बसला होता. तो या अपघातातून वाचू शकला नाही. दोन्ही भाऊ दीव येथून कुटुंबाला भेटून लंडनला परतत होते. विश्वास कुमार यांनी रुग्णालयातून त्यांच्या भावाचा शोध घेतला मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अजयच्या दीवमधील अंतिम यात्रेदरम्यान विश्वास कुमारने त्याला खांदा दिला. विश्वास कुमार याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण क्षण होता.

दरम्यान, अपघातानंतर, अजयच्या मृतदेहासह ७ प्रवाशांचे मृतदेह दीव येथे आणण्यात आले. दुसरीकडे, पोलिस आणि प्रशासनाने आतापर्यंत २०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मृतदेहांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवली जात आहे. तर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २५ जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात