vishnu tiwari released from agra central jail after 20 years | जो गुन्हा केलाच नव्हता, त्याबद्दल २० वर्षं शिक्षा भोगून 'तो' अखेर जेलबाहेर आला; पण...

जो गुन्हा केलाच नव्हता, त्याबद्दल २० वर्षं शिक्षा भोगून 'तो' अखेर जेलबाहेर आला; पण...

ललितपूर: बलात्काराच्या आरोपात २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू तिवारी नावाच्या व्यक्तीची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तब्बल २ दशकांनंतर विष्णू तिवारी तुरुंगातून बाहेर आले. त्यांना ३ वर्षे ललितपूरच्या, तर १७ वर्षे केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आलं होतं. ललितपूरमधल्या महरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिलावन गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानं विष्णू यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघड

बलात्कार प्रकरणात गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू यांची दोनच दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तिवारी २३ वर्षांचे असताना ट्रायल कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ते बलात्काराच्या आरोपात दोषी आढळले होते. आता २० वर्षांनंतर उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पण या कालावधीत त्यांनी स्वत:चे आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमावले.

महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटक

आयपीसी आणि एससी/एसटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल
विष्णू उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी आहेत. वर्ष २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णू यांच्यावर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि दोन भावांसोबत राहायचे. कुटुंबाला मदत करण्यासाठी ते नोकरी करत होते.

वडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकले
ट्रायल कोर्टानं विष्णू तिवारींना दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये त्यांची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. २००५ मध्ये विष्णू यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्यांना आव्हान देता आलं नाही. सहा वर्षांपूर्वी विष्णू यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्यांना वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. दोन भावांच्या अंत्यविधींसाठीदेखील त्यांना पॅरोल मिळाला नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vishnu tiwari released from agra central jail after 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.