साय : सरपंच ते मुख्यमंत्री; शाह यांच्यामुळे ‘मोठा माणूस’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 06:32 AM2023-12-11T06:32:43+5:302023-12-11T06:33:19+5:30

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विष्णू देव साय यांनी गावच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू केला.

Vishnu Dev Sai, who was elected as the Chief Minister of Chhattisgarh, started his political journey from the post of village sarpanch | साय : सरपंच ते मुख्यमंत्री; शाह यांच्यामुळे ‘मोठा माणूस’

साय : सरपंच ते मुख्यमंत्री; शाह यांच्यामुळे ‘मोठा माणूस’

रायपूर : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विष्णू देव साय यांनी गावच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू केला. राज्यात पक्षाची सत्ता आल्यास साय यांना ‘मोठा माणूस’  बनवू, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले होते, ते त्यांनी पाळले.

विष्णू देव साय हे आदिवासीबहुल जशपूर जिल्ह्यातील बगिया या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत.

१९८९ मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि पुढच्या वर्षी बिनविरोध सरपंच झाले.

१९९०मध्ये मध्य प्रदेशातील (अविभाजित) तापकारा (जशपूर जिल्ह्यातील) येथून ते प्रथमच भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. रायगड लोकसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा खासदार झाले.

२०१४ मध्ये विष्णू देव साय यांना पोलाद आणि खाण राज्यमंत्री करण्यात आले.

आजोबा दिवंगत बुधनाथ साय हे १९४७ ते १९५२ या काळात राज्यपालनियुक्त आमदार होते.

Web Title: Vishnu Dev Sai, who was elected as the Chief Minister of Chhattisgarh, started his political journey from the post of village sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.