वीरभद्र सिंह यांचे फार्महाउस जप्त
By Admin | Updated: April 4, 2017 05:25 IST2017-04-04T05:25:47+5:302017-04-04T05:25:47+5:30
वीरभद्र सिंह व इतरांची हवाला व्यवहारात चौकशी करीत असून या प्रकरणी २७ कोटी रुपये बाजारात किमत असलेले फार्म हाऊस जप्त केले.

वीरभद्र सिंह यांचे फार्महाउस जप्त
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय (ईडी) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह व इतरांची हवाला व्यवहारात चौकशी करीत असून या प्रकरणी २७ कोटी रुपये बाजारात किमत असलेले फार्म हाऊस जप्त केले.
आदेशात या फार्म हाऊसचे पुस्तकी मूल्य ६.६१ कोटी रुपये असले तरी बाजारमूल्य २७ कोटी रुपये आहे. वीरभद्र सिंह, त्यांची पत्नी आणि इतरांच्याविरोधात ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा गुन्हा सीबीआयने नुकताच दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या (एफआयआर) आधारे ईडीने २०१५ मध्ये पीएमएलएअंतर्गत वीरभद्र सिंह व इतरांवर फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)