मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:48 IST2025-07-30T17:47:58+5:302025-07-30T17:48:37+5:30
Dog Attacks Woman: गुरुग्राममध्ये मिलेनियम सिटीच्या गोल्फ कोर्स रोडवरील एका उच्चभ्रू निवासी सोसायटीत पाळीव कुत्र्याने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला.

मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
गुरुग्राममध्ये मिलेनियम सिटीच्या गोल्फ कोर्स रोडवरील एका उच्चभ्रू निवासी सोसायटीत पाळीव कुत्र्याने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेत महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. संपूर्ण घटना घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास सोसायटीत चालत असताना आपल्या मालकिणीसह समोरून येणाऱ्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी आजूबाजुच्या लोकांनी ताबडतोब कुत्र्याला महिलेपासून लांब केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु, या हल्ल्यात महिलेच्या हाताला दुखापत झाली, असे सांगण्यात आले. याप्रकरणी गुरुग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपासाला सुरुवात केली आहे.
#गुरुग्राम की पॉश कॉलोनी में पालतू कुत्ते ने सैर कर रही महिला पर जानलेवा हमले का वीडियो वायरल...बेमुश्किल बचाई महिला की जान....पूरी घटना सीसीटीवी में कैद.....#Gurugram#PetDogs#DogsLoverpic.twitter.com/baiR3ariYa
— Dharamvir Sharma (@DharamvirNews) July 30, 2025
पाळीव कुत्र्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हुबळी येथे दोन भडक्या कुत्र्यांनी तीन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला. पीटीआय वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चिमुकली स्त्यावरून चालत असताना दोन भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे.