चोरीशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बिहारमधील बेगुसराय येथील एका चोरट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. धावत्या ट्रेनमधून प्रवाशाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याची निंजा टेक्निक पाहून अनेकांना डोक्याला हात मारला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक प्रवाशी रेल्वेच्या दारात बसला आहे. तर, रेल्वे गंगा नदीवरून जात आहे. दराजवळ बसलेल्या प्रवाशाच्या हातात फोन आहे. अचानक एक वाऱ्याच्या वेगाने त्याच्यासमोर येतो आणि त्याच्या हातातील फोन हिसकावून घेऊन जातो. हे सर्व इतक्या वेगाने घडते की प्रवाशाला समजत नाही की त्याला काय झाले. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहिल्यानंतर समजते की चोर आधीच रेल्वे पुलाच्या रेलिंगला लटकलेला असून रेल्वेच्या दारात बसलेल्या प्रवाशांकडे लक्ष ठेवून आहे. तसेच चोराने त्याचा चेहरा कापडाने झाकलेला आहे, त्यामुळे त्याला ओळखणे कठीण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील बेगुसराय येथील राजेंद्र पुलावर घडली, जेव्हा पटना-कटिहार इंटरसिटी एक्सप्रेस पुलावरून जात होती. अशा प्रकारच्या चोरीचे व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत, जेव्हा चोरांनी चालत्या ट्रेनमधून प्रवाशांचे फोन हिसकावले. चोर फक्त रेल्वेच्या दारात बसलेल्या प्रवाशांना लक्ष्य करतात.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रियाया व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली. का वापरकर्त्याने व्हिडिओवर कमेंटमध्ये लिहिले आहे की, "चोरट्यांमुळे रेल्वेतून प्रवास करणे कठीण झाले आहे, पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे." दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, "टॉम क्रूझला कॉल करा, हे इंडियन मिशन इम्पॉसिबल आहे." तर, एका व्यक्तीने चक्क चोराचे कौतुक केले आहे. "चांगल्या टॅलेंटचा चुकीच्या ठिकाणी वापर होत आहे", असे ते म्हणाले.