केरळच्या एका ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून स्वतःची अलिशान कार तयार केली आहे. विशेष म्हणजे, ही कार साधीसुधी नसून चक्क हुबेहूब लॅम्बोर्गिनी कारसारखी दिसते. आर्थिक अडचणींमुळे लॅम्बोर्गिनी कार खरेदी करणे परवडत नसल्याने संबंधित तरुणाने स्वत:च्या गॅरेजमध्ये ही अलिशान कार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या प्रयत्नांना यश आले. बिबिन असे संबंधित तरुणाचे नाव आहे. दरम्यान, बिबिन बनवलेली लॅम्बोर्गिनी कारची देशभरात चर्चा रंगली आहे.
अरुण स्मोकी नावाचा एक युट्यूबरने बिबिनची मुलाखत घेतली. बिबिन सांगितले की, ही अलिशान कार तयार करण्यासाठी भंगारातून साहित्य गोळा केले.बिबिनने तीन वर्षांपूर्वी ही कार बनवण्यासाठी सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्याने कारचे ८० टक्के काम पूर्ण केले आहे. आर्थिक अडचणींमुळे बिबिनला ही कार बनवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कारसाठी आतापर्यंत १.५ लाख खर्च केले आहेत. बिबिन हा केरळमधील एका कंपनीच्या क्यूए विभागात काम करतो.
बिबिनच्या कठोर परिश्रमाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या त्याच्या ध्येयाचे कौतुक सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "या तरुणाच्या कौशल्याचे कौतुक करायला पाहिजे." दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "अगदी मनाला भिडणारे! अशक्य गोष्ट शक्य केल्याबद्दल तुम्हाला सलाम."