संतापजनक! चालत्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रस्त्यावर फेकला, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घटनेमागचे सत्य सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:06 IST2025-08-05T13:56:03+5:302025-08-05T14:06:37+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका रुग्णवाहिकेतून एक मृतदेह रस्त्यावर फेकल्याचे दिसत आहे.

संतापजनक! चालत्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रस्त्यावर फेकला, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घटनेमागचे सत्य सांगितले
सोशल मीडियावर एका रुग्णवाहिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या रुग्णवाहिकेतून एक मृतदेह रस्त्यावर फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील आहे.हा मृतदेह रस्त्यावर का फेकण्यात येत आहे. यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमागील सत्य आता समोर आले आहे. पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
२४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचे संतप्त कुटुंब आणि ग्रामस्थ लखनऊ-गोंडा रस्त्यावर निदर्शने करत होते. त्यादरम्यान, कोणीतरी वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह मृतदेह फेकून दिला.
ही घटना उत्तर प्रदेश येथील गोंडा देहात कोतवाली परिसरातील बालपूर जाट गावातील असल्याचे वृत्त आहे. मृत तरुणाचे नाव हृदय लाल असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी पैशांवरून वाद झाला होता. यामध्ये त्याला मारहाण करण्यात आली. या भांडणात तो तरुण जखमी झाला आणि मंगळवारी लखनऊमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एका व्यक्तीने मृतदेह टाकला
यानंतर, तरुणाच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच, तेथे संतापाचे वातावरण निर्माण झाले. गावकरी आणि नातेवाईक लखनौ-गोंडा रस्त्यावर जमले. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लखनौ-गोंडा रस्त्यावरून एक रुग्णवाहिका मृतदेह घेऊन येत होती. या रुग्णवाहिकेच्या दरवाजा जवळ एक व्यक्ती लटकत होती आणि त्याने हृदय लालचा मृतदेह स्ट्रेचरसह रस्त्यावर टाकला.
यानंतर रुग्णवाहिका तिथून निघून गेली.ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रस्त्यावर मृतदेह पडलेला पाहून कुटुंब आणि गावकरी हादरले. महिला मृतदेहाला मिठी मारत रडू लागल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मृतदेह एका छोट्या ट्रकमध्ये अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आला.