शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

खासगी फोटो व्हायरल करणं हा बलात्काराइतकाच गंभीर गुन्हा, कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 11:59 AM

बी.टेकच्या विद्यार्थ्याची इंटरनेटवर एका तरूणीशी ओळख झाली. तीन वर्ष सोशल मीडियावर दोघांची मैत्री होती. तरूणीचा विश्वास जिंकून त्याने...

कोलकाता : एखाद्या तरूणीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं बलात्काराप्रमाणे आहे,  असा प्रकार म्हणजे व्हर्चुअल बलात्कार मानला जाईल , असं पश्चिम बंगालमधील एका न्यायालयाने म्हटलं आहे. रिव्हेंज पॉर्नच्या ( बदला घेण्यासाठी एखाद्याचे अश्लील फोटो व्हायरल करणं) एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान निर्णय देताना न्यायालयाने खासगी फोटो व्हायरल करणं हा बलात्काराइतकाच गंभीर गुन्हा आहे असं मत व्यक्त केलं.या प्रकरणात इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याला न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा दिली आहे. तसंच दोषीला 9 हजार रूपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांमध्ये न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला. देशाच्या न्यायव्यवस्थेत सर्वाधिक लवकर आलेल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. काय आहे प्रकरण -बी.टेकच्या विद्यार्थ्याची इंटरनेटवर एका तरूणीशी ओळख झाली. तीन वर्ष सोशल मीडियावर दोघांची मैत्री होती. तरूणीचा विश्वास जिंकून त्याने तिच्याकडे खासगी फोटोंची मागणी केली. कालांतराने त्याने शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली. तरूणीने विरोध केल्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरूवात केली आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.   

 

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालय