जम्मू : खलिस्तानवादी दहशतवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रानवालेचे पोस्टर काढण्यात आल्यामुळे जम्मूमध्ये शीख युवकांनी शुक्रवारी प्रतिबंधात्मक आदेश धुडकावत लागोपाठ तिसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने सुरूच ठेवल्याने तणाव कायम आहे. गुरुवारी निदर्शनांदरम्यान पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात एक युवक ठार, तर सात जण जखमी झाल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण जम्मूू जिल्ह्यात १४४ कलम लागू करीत जमावबंदीचा आदेश जारी केला होता.हिंसाचारग्रस्त सतवारी- राणीबाग- गडीगढ- आर.एस. पुरा भागात संचारबंदीसदृश स्थिती असली तरी शिखांनी निदर्शने सुरूच ठेवल्यामुळे सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिखांच्या गटांनी जम्मू- पठाणकोट महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी टायर जाळून निदर्शने करण्यात आली. पूंछ, कथुआ आणि राजौरी भागातही लोकांनी पोलीस आणि सरकारवि$रोधी घोषणा दिल्या.निर्मनुष्य रस्ते, संपर्काची साधनेही ठप्प जम्मू शहरातील रस्ते शुक्रवारी निर्मनुष्य दिसत होते. या शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद होत्या. मोबाईल आणि इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्थगित ठेवण्यात आल्याने संपर्कव्यवस्थाही कोलमडली होती. लष्कराने गुरुवारी रात्री ध्वजसंचलन करीत नागरिकांना शांततेचे आवाहन केले. (वृत्तसंस्था)ब्ल्यू स्टार आॅपरेशनला शनिवारी ३१ वर्षे पूर्ण होत असून, जम्मूत उद्भवलेली परिस्थिती पाहता अमृतसरसह या राज्याच्या विविध भागांत सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर हाकलण्यासाठी आॅपरेशन ब्ल्यू स्टार राबविण्यात आले होते. पंजाबच्या पोलिसांनी अमृतसर फरीदकोट, मोगा श्रीमुक्तसर साहिब या ठिकाणी ध्वजसंचलन पार पाडले. महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षा वाढविण्यात आली असून, ठिकठिकाणी नाकेबंदीसह वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.गृहमंत्र्यांकडून आढावाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी जम्मू-काश्मीरला सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे. नॅ.कॉ.कडून निषेध शीख निदर्शकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याबद्दल मुख्य विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने तीव्र निषेध केला आहे. ४नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना क्लीन चिट दिल्याच्या विरोधात शुक्रवारी शीख संघटनांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली. हातात फलक आणि बॅनर्स घेतलेले शेकडो लोक सकाळी ११.३० वाजता २४, अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर जमले. ?या लोकांनी टायटलर यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. यावेळी टायटलर यांच्या प्रतिमेचे दहनही करण्यात आले. या निदर्शकांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि मुख्यालयाबाहेर कठडेही लावण्यात आले होते. (वृत्तसंस्था)