शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये हिंसक आंदोलन, मॉलमध्ये तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 12:00 AM

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. 

अहमदाबाद -  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे.  'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाने हिंसक रुप घेतलं आहे. अहमदबादमधील अल्फा आणि हिमालया मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचा प्रकार समोर आला आहे. पद्मावत चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असला तरी या चित्रपटाला सुरु असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. या चित्रपटाला विरोध करणार्यांनी आज अहमदाबादमधील काही मॉल्समध्ये जाऊन तोडफोड केली व तीन मॉलमध्ये आग लावण्याचेही प्रकार घडले. अहमदाबादमधील हिमालयन मॉलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही नासधूस करण्यात आली. मेमनगर भागातील एका मॉलमध्येही जमावाने तोडफोड केली. 

यापूर्वी 20 तारखेला हरियाणातील फरीदाबादमधील बल्लभगड येथील एका सिनेमाहॉलचे तिकिट काऊंटर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती. तोंडाला कपडा बांधून आलेल्या युवकांनी हा हल्ला केला व त्याचे चित्रीकरण केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

वादामुळे पद्मावती हे मूळ नाव बदलून चित्रपटाचे पद्मावत नाव करण्यात आले. पण तरीही वाद शमलेला नाही. भन्साळींनी ऐतिहासिक तथ्याची मोडतोड केल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात येतोय. भन्साळी, चित्रपटातील कलाकारांना धमकी देणा-या करणी सेनेने आता सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही धमकी दिली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलसाठी प्रसून जोशींना जयपूरमध्ये पाय ठेऊ देणार नाही अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरीयाणा या राज्यातील चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे पण हा सर्व वाद पाहता गुजरातमधील मल्टीप्लेक्स असोशिएशनने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Padmavatपद्मावतPadmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीKarni Senaकरणी सेना