शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

पोलीस चकमकीत मला ठार मारण्याचा कट, विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांचा खळबळजनक आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:40 IST

काही काळासाठी सोमवारी ‘बेपत्ता’ झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली.

अहमदाबाद : काही काळासाठी सोमवारी ‘बेपत्ता’ झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली. काही लोकांनी आपली मुस्कटदाबी करण्याचा व पोलीस चकमकीत आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांंनी केला; परंतु कोणत्याही धमक्या व दडपणाला बळी न पडता आपण हिंदूंच्या व शेतकºयांच्या हितासाठी आवाज उठवतच राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर आपण राजस्थानच्या न्यायालयात हजर होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.या घटनाक्रमाबाबत अतिशय भावनिक होत बोलताना तोगडिया (६२) म्हणाले की, सोमवारी सकाळी मी पूजा करीत असताना मला एक निरोप मिळाला की, गुजरात पोलिसांसह राजस्थान पोलिसांचे एक पथक चकमकीत तुम्हाला मारण्यासाठी येत आहे. त्यानंतर मी विहिंपच्या एका कार्यकर्त्यासोबत आॅटोमध्ये शहरातील थलतेज भागात गेलो. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना मी फोन केला; पण पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी येत असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. त्यामुळे अधिकच संशय निर्माण झाला. त्यानंतर मी माझा मोबाईल बंद केला. त्यानंतर मी एका विमानाने जयपूरला जाण्याचा आणि न्यायालयासमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला. मी आॅटोरिक्षातून विमानतळावर जात असताना अचानक मला चक्कर आली आणि मी चालकाला सांगितले की, एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यानंतर मी बेशुद्ध झालो. (वृत्तसंस्था)योग्यवेळी नावे जाहीर करूप्रवीण तोगडिया म्हणाले की, हिंदूंसाठी मी आवाज उठवत आलो आहे. राममंदिर, गोरक्षेसाठी राष्ट्रीय कायदा, काश्मिरातील हिंदूंचे पुनर्वसन, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, या मागण्यांसाठी आवाज उठवत आहे; मात्र माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.जे लोक यामागे आहेत त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करील, असेही त्यांनी सांगितले. राजस्थान पोलीस मला अटक करण्यास आले होते; पण तेथील मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. गुजरातच्या न्यायालयाने माझ्याविरुद्ध वॉरंट जारी केले तेव्हाही मुख्यमंत्री विजय रूपानी यांना माहीत नव्हते. ज्या लोकांच्या आदेशावर पोलीस माझ्याविरुद्ध कारवाई करीत आहेत त्यांची नावे पुराव्यानिशी सादर करू, असेही ते म्हणाले. विहिंपशी संबंधित डॉक्टरांना सीबीआय धमकावीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया