शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:40 IST

काँग्रेसचा आरोप; दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात यावे. जिथे हिंसाचार झाला त्याठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. याचा अर्थ ही सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणा हिंसक प्रकार रोखण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरली. 

सुरजेवाला यांनी सांगितले की, लाल किल्ल्यामध्ये दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांनी धुडगूस घातला. तिथे ध्वजस्तंभावर झेंडा फडकवला. या दीप सिद्धूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले आहे. दीप सिद्ध हा कोणाचा माणूस, याचे अनेक पुरावे समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

‘हिंसाचार घडविणाऱ्यांचे केंद्राशी लागेबांधे’ शेतकरी आंदोलकांची माथी भडकविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या हस्तकांनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. अशा लोकांचे सत्ताधारी पक्षाशी संबंध आहेत, असा आरोप माकपने भाजपचे नाव न घेता केला आहे. हिंसाचार झाला असला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असे माकपने म्हटले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार