शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 23:02 IST

मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे

मणिपूर - गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. मणिपूरमधील मोरेह येथे पोलीस आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली होती. उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर दबा धरून हल्ला केला. रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये चार पोलीस कमांडो जखमी झाले होते. त्यानंतर, थौबल आणि इम्फाळ वेस्ट जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी थौबल जिल्ह्यातील लिलोंग परिसरात अज्ञात शस्त्रधारी गुंड आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली. या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  

मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. शस्त्रधारी गुंडांनी स्थानिकांवर हल्ला केला, यावेळी गोळीबारही करण्यात आला. त्यामध्ये, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातही संचारबंदी लावण्यात आली आहे. आता, मणिपूरच्या इम्फाळ घाटीत पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर विष्णुपूर जिल्ह्यातील संचारबंदीत देण्यात आलेली सवलत बंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एन. बीरेन यांनी एका व्हिडिओ संदेशातून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. संबंधित घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, तसेच सरकारला सहकार्य करावे, असे बीरेन यांनी म्हटले आहे. लिलोंगच्या नागरिकांनी हिंसात्मक पाऊल उचलू नये, पोलीस आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,  असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच झाली झटापट

मणिपूरमध्ये ३० डिसेंबर रोजीही उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायांना दुखापत झाली होती. रात्री सुमारे ११.४० च्या सुमारास संदिग्ध कुकी उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर आरपीजीद्वारे हल्ला केला. त्यानंतर उग्रवाद्यांनी मेरेह येथे तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरदाखल कारवाईमध्ये पोलिसांनीही गोळीबार केला. दोन्हीकडून रात्रभर गोळीबार सुरू होती, असे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारChief Ministerमुख्यमंत्रीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस