शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Vinesh Phogat : "विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा"; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 08:46 IST

Vinesh Phogat And Nayab Singh Saini : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. विनेश फोगटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. 

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटूविनेश फोगट हिने कुस्तीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. याच दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. विनेश फोगटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. 

"हरियाणाची आमची शूर कन्या विनेश फोगट हिने जबरदस्त कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता, काही कारणांमुळे ती ऑलिम्पिकची फायनल खेळू शकली नाही, पण ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवलं आहे की, विनेश फोगटचं स्वागत आणि अभिनंदन हे एका मेडलिस्टसारखंच केलं जाईल."

"हरियाणा सरकार सिल्वर मेडल विजेत्याला जो सन्मान, बक्षीस आणि सुविधा देतं, त्या सर्व विनेश फोगटला दिल्या जातील. आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश!" असं हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त आढळल्याने विनेश फोगटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं.

हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ६ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ४ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना १५ लाख रुपयांची रक्कमही देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. यासोबतच मेडलनुसार ग्रुप ए, ग्रुप बी किंवा ग्रुप सी सरकारी नोकरीही दिली जाणार आहे.

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Haryanaहरयाणा