शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

मतदारसंघात पाय न ठेवता काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:28 IST

त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा पराभव केला.  

हुबळी : सर्वाेच्च न्यायालयाने मतदारसंघात जाण्यास बंदी घातली असतानाही काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री विनय कुलकर्णी धारवाड मतदारसंघातून १८ हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा पराभव केला.  

विद्यमान आमदाराला सलग दुसऱ्यांदा निवडून न देण्याची परपंरा या मतदारसंघाने यावेळीही कायम राखली आहे.  भाजप कार्यकर्ते योगेश गौडा यांचा २०१६ मध्ये खून झाला होता. याप्रकरणी विनय कुलकर्णी एक संशयित आरोपी आहेत. २०२० मध्ये त्यांना याप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मतदारसंघात जाण्यास मनाई केली होती. तरीही काँग्रेसने यावेळी त्यांना उमेदवारी दिली होती.  भाजपचे आमदार अमृत देसाई यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये असंतोष होता. 

विनय कुलकर्णी यांच्या पत्नी शिवलिला  यांनीच या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. मतदारसंघामधील असंतोषाचे रुपांतर काँग्रेससाठी मतदानांमध्ये करण्यात शिवलिला आणि त्यांचे कार्यकर्ते यशस्वी ठरले. विनय हे ८९,३३३ मते मिळवून १८,०३७ मताधिक्याने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे  तिसऱ्या क्रमांकाची १,५२१ मते नोटाला आहेत. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा