शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! दलित असल्याने भाजपा खासदाराला नाकारला गावात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:50 IST

काळ बदलला तरी आजही अनेक ठिकाणी कनिष्ठ जातीच्या व्यक्तींना भेदभावाचा सामना करावा लागतो. दरम्यान, खुद्द एका खासदारालाच जातीभेदाचा सामना करावा लागला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये खुद्द एका खासदारालाच जातीभेदाचा सामना करावा लागला कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील खासदार असलेल्या ए. नारायणस्वामी यांना दलित असल्याने गावात प्रवेश नाकारला गेलाकुठल्याही दलित वा कनिष्ठ जातीमधील व्यक्तीचा प्रवेश निषिद्ध असल्याचे सांगत नाकारला प्रवेश

बंगळुरू - काळ बदलला तरी आजही अनेक ठिकाणी कनिष्ठ जातीच्या व्यक्तींना भेदभावाचा सामना करावा लागतो. दरम्यान, कर्नाटकमध्ये खुद्द एका खासदारालाच जातीभेदाचा सामना करावा लागला आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील खासदार असलेल्या ए. नारायणस्वामी यांना दलित असल्याने गावात प्रवेश नाकारला गेला. तुमकूर जिल्ह्यातील पवागडा येथे ही घटना घडली.खासदार ए. नारायण स्वामी यांनी आरोप केला की, ''मी अधिकाऱ्यांसह गोला समुदायाची वस्ती असलेल्या गोलारहट्टी या गावात गेलो होतो. तिथे काही लोकांनी मला सांगितले की मी अनुसूचित जातीमधील आहे. त्यामुळे मला गावात प्रवेश करण्याची परवानगी देता येणार नाही.'' आता या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गोलारहट्टी येथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या काही लोकांनी नारायणस्वामी यांना माघारी परतण्यास सांगितले. गोलारहट्टीमध्ये कुठल्याही दलित वा कनिष्ठ जातीमधील व्यक्तीचा प्रवेश निषिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार नारायणस्वामी हे दलित जातीमधून येतात. तर गोलारहट्टीमध्ये वास्तव्यास असलेला गोला समुदाय हा इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतो. या गावामध्ये आतापर्यंत कुठल्याही मागास जातीमधील व्यक्तीला प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे उपस्थितांनी नारायणस्वामी यांना सांगितले. त्यानंतर दोन्हीकडून झालेल्या किरकोळ वादानंतर नारायणस्वामी यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, नारायणस्वामी यांना अडवणारे लोक नेमके कोण होते, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.   

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणKarnatakकर्नाटकBJPभाजपा