शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा ; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 7:00 AM

अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा चंद्रापासून अवघ्या  २.१ किलोमीटर  अंतरावर असताना नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

ठळक मुद्देविक्रम लॅँडरशी शेवटच्या टप्प्यात तुटला संपर्क    : पंतप्रधानांसह संपूर्ण देश शास्त्रज्ञांच्या पाठीशीइस्त्रोने मोहीम ९५  टक्के यशस्वी झाल्याचा केला दावा मोदींनी दिला शास्त्रज्ञांना धीर

निनाद देशमुख-  बेंगळुरू :  इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह समस्त भारतीयांनी पाहिलेले चंद्रावर यान उतरविण्याचे स्वप्न शेवटच्या क्षणी भंगले. मात्र, चांद्रयानाची चंद्राभोवती प्रदक्षिणा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बेंगळुरू येथील इस्त्रोच्या नियंक्षण कक्षात येऊन शास्ज्ञांना धीर देत संपूर्ण देश तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. चांद्रयान मोहिमेत महत्वाच्या असलेल्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर  अंतरावर असताना नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून इस्त्रोच्या केंद्रासह संपूर्ण देश प्रचंड उल्हासित होता. विक्रम लॅँडर चंद्रावर उतरण्याची वेळ जवळ येत असताना उत्साह प्रचंड वाढला. बंगलोर येथील टेलीमेटी कमांड सेंटर आणि डीप स्पेस सेंटर येथील मुख्य नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून होते. गुरुवारी यानाची तपासणी केल्यानंतर ते सुस्थितीती असल्याचे जाहीर करण्यात आले. मध्यरात्री, १ वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरणे अपेक्षित होते. नियंत्रण कक्षात १ वाजून ३८ मिनिटांनी  लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.यावेळी लँडर चंद्राच्या भूमीपासून ३० कि.मी. अंतरावर होते.   यानाचा वेग ताशी ६ हजार २२१ कि.मी.  होता. हा वेग कमी करण्यासाठी १ वा. ३८ मिनिटांनी यानाचे सॉफ्ट लँण्डींग करण्यासाठी रफ ब्रेकिंग यंत्रणा सुरू झाली. या काळात विक्रम लँडरवरील संगणक प्रणाली आज्ञावली घेत होती.  ब्रेकिंग यंत्रणा सुरू झाल्यानंतर यानाचे ४ इंजिन सुरू झाले. यानाची प्रणोदकसुरू होताच वेग कमी झाला. याचा संदेश विक्रम लँडरकडून नियंत्रण कक्षाकडे येताच सर्वांनी जल्लोष केला. मात्र लँडींगला अजूनही काही मिनिटे बाकी होती. यामुळे शास्त्रज्ञांच्या चेहºयावर तणाव दिसत होता. १ वाजून ४८ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रापासून ७ कि.मी. अंतरावर होते. यावेळी यानाचे इंजिन पुन्हा पेटविण्यात आले. यामुळे यानाचा वेग जवळपासून ५२६ किमी एवढा झाला. हा संदेश मिळताच पुन्हा सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. यानाचे सर्व कार्य योग्यरित्या होत होते. मात्र शास्त्रज्ञांवरील दडपण कायम होते.
७.४ कि.मी. अंतरावर असताना लँडींगच्या दुसऱ्या टप्याचे  ब्रेकिंग सुरू करण्यात आले. ही प्रक्रिया सुरळित सुरू झाल्याचा संदेश यानाने दिला. काही वेळात यान चंद्रावर उतरेल असे वाटत होते. यानाने नियोजित वेळेत म्हणजेच १ वा. ५० मि. नेव्हिगेशन प्रणाली सुरू करणे अपेक्षित होते. मुख नियंत्रण कक्षात लावलेल्या स्क्रिनवर यान योग्यरित्या  पुढे जात असल्याचे दिसत होते. यानाचा वेग कमी करीत तो शून्यावर आणण्यात येणार होता. १. ५५ मि. यान चंद्राच्या ५ कि.मी. अंतरावर होते. मुख्य कक्षात असलेले पंतप्रधान मोदीही टाळ्या वाजवून शास्त्रज्ञांचे कौतुक करीत होते. सर्वांना चांद्रयानाच्या लँडींगची प्रक्रिया पुर्ण झाल्याचे वाटले. यान पुढे जात असताना चंद्रापर्यंत केवळ २.१२ कि.मी. अंतरावर असताना यानाकडून येणारे संदेश अचानक बंद झाले. मोहिमेचे प्रमुख कक्षातील सर्व शास्त्रज्ञांशी संपर्क साधून होते.  काही वेळाने नियंत्रण कक्षातील प्रमुखांनाही विक्रम लँडरकडून मिळणारे संदेश बंद झाल्याचे सांगताच सर्वांचे चेहरे पडले. इस्त्रोचे प्रमुख के. शिवम नियंत्रण कक्षातील शास्त्रज्ञांकडून  माहिती घेत होते.  यानाच्या लँडींगची नियोजित वेळ निघून गेल्यामुळे काय झाले असेल याचा अंदाज सर्वांना आला. शिवम यांनी पंतप्रधान मोदी यांना सर्व माहिती दिली. सर्व शास्त्रज्ञ तसेच भारतातील इस्त्रोच्या सर्व केंद्रातून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न  सुरू होता.  मात्र तो झाला नाही. त्यामुळे चांद्रयान सुखरूप उतरण्याचे स्वप्न भंग पावले.................मोदींनी दिला शास्त्रज्ञांना धीरचंद्राच्या दक्षिण धु्रवावर जाण्यासाठी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी अहोरात्र प्रयत्न केले. पण लँडर चंद्रापासून केवळ २.१ कि.मी अंतरावर असतानाच यानाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे नियंत्रण कक्षातील सर्व शास्त्रज्ञ तणावाखाली होते. पंतप्रधान मोदी यांच्या हे लक्षात आले त्यांनी त्वरीत नियंत्रण कक्षात येत सर्व शास्त्रज्ञांच्या पाठीवर थाप मारीत त्यांचे कौतुक केले. शास्त्रज्ञांजवळ जात मोदी म्हणाले तुमच्या कामाचा देशाला अभिमान आहे. तुम्ही देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. माज्यासह संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. धीर सोडू नका. आपला प्रवास पुढेही असाच सुरू राहणार आहे. ...........रात्रभर लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूचंद्राच्या ६७ अक्षांक्षाच्या जवळ विषववृत्तापाशी  अचूक ९० अंशाचा कोन करून यानाने योग्य कक्षा साधणे गरचेजे होते. यान नियोजित वेळेत पुढे जात असताना २.१ कि.मी. अंतरावर संपर्क तुटला. यामुळे सर्वजण हताश झाले. मात्र यानाशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर सुरू होता. देशभरातील इस्त्रोच्या 

इस्त्रोकडून ९५ टक्के यश मिळाल्याचा दावा इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान  -२ मिशन ही अत्यंत गुंतागुंतीची मिशन होती. चंद्राच्या अबाधित दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यासाठी आॅर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र आणले होते.  22 जुलै, 2019 रोजी चंद्रयान -2 लाँच झाल्यापासून केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाने मोठ्या अपेक्षेने आणि उत्साहाने एका टप्प्यापासून दुसºया  टप्प्यात प्रगती पाहिली.  चंद्राच्या केवळ एका क्षेत्राचाच नाही तर  पृष्ठभाग तसेच चंद्राच्या उप-पृष्ठभागाचा सर्वांगिण अभ्यास होणार होता.    ऑर्बिटर कॅमेरा आतापर्यंतच्या कोणत्याही चंद्राच्या मिशनमध्ये सर्वाधिक रेझोल्यूशन असलेला कॅमेरा आहे.  त्याद्वारे मिळणाऱ्या  उच्च रिझोल्यूशन प्रतिमा जागतिक वैज्ञानिक समुदायासाठी उपयुक्त ठरतील. अचूक प्रक्षेपण आणि मिशन व्यवस्थापनाने नियोजित एक वर्षाऐवजी ऑर्बिटरचे सुमारे 7 वर्षांचे आयुष्य सुनिश्चित केले आहे.  विक्रम लॅँडरच्या सर्व सिस्टीम आणि सेन्सर या टप्प्यापर्यंत उत्कृष्ट कार्य केले. यशाचा निकष मिशनच्या प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित करण्यात आला होता आणि आतापर्यंत मिशनच्या ९५ टक्के  उद्दिष्टे साध्य झाली आहेत आणि लँडरशी संप्रेषण गमावले गेले नसले तरी चंद्रशास्त्राला भारताची ही मोहीम निश्चितच हातभार लावेल. .............

टॅग्स :PuneपुणेBengaluruबेंगळूरChandrayaan 2चांद्रयान-2K. Sivanके. सिवनNarendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रो