शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विजयवाड्याच्या दुर्गा मंदिरात पैशांचा पाऊस, १८ दिवसांत करोडो रुपयांची देणगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 17:12 IST

Vijayawada Durga Temple : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात श्रावण महिन्यात पैशांचा पाऊस पडत आहे.

विजयवाडा : सध्या श्रावण महिना सुरु असून देशातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. अशातच आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात श्रावण महिन्यात पैशांचा पाऊस पडत आहे. दुर्गा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मोठी देणगी दिली आहे. 

श्री दुर्गा मल्लेश्वर स्वामीवराला देवस्थानम येथे भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या रोख रक्कमेसह सोने आणि चांदीच्या वस्तू मोजण्याचे काम कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरु आहे. गेल्या १८ दिवसांत दुर्गादेवीला दान म्हणून दिलेली रक्कम २,९७,४७,६६८ रुपये इतकी जमा झाली आहे. म्हणजेच, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दररोज सरासरी १६,६२,६४८ रुपये जमा झाले आहेत. याशिवाय, ४१० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदी दानपेटीतून देवीला अर्पण करण्यात आली आहे.

याचबरोबर, दुर्गा देवीच्या दानपेटीत परकीय चलन सुद्धा दान म्हणून जमा  होत आहे. यामध्ये ८७५ ऑस्ट्रेलियन डॉलर, ७६५ अरब दिरहम, ६८१ यूएस डॉलर, २८० थाई बात, १०७ सौदी रियाल, ६२ मलेशियन रिंगिट, ५० दक्षिण आफ्रिकन रेंड, ३५ कॅनेडियन डॉलर, ३० युरो, २० ब्रिटिश पौंड, १७ ​​कतारी रियाल, ९ बेन्स भाविकांनी दानपेटीत दान केले आहेत. तसेच, ऑनलाइन ई-दानद्वारे ५६,३२० रुपयांची देणगी मिळाल्याचे मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंदिरात विशेष सोहळ्याचे आयोजनदुसरीकडे, मंदिराचे कार्यकारी अधिकारी रामाराव यांनी सांगितले केले की, या महिन्याच्या २३ तारखेला विजयवाडा दुर्गम्मा मंदिरात सामूहिक वरलक्ष्मी व्रत आयोजित केले जाईल. तसेच या महिन्याच्या १६ तारखेला दुर्गामा देवी वरलक्ष्मीच्या रूपात भक्तांना दिसणार आहे. या महिन्याच्या १८ ते २० तारखेपर्यंत दुर्गामा मंदिरात पवित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTempleमंदिरJara hatkeजरा हटके