शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विजय रूपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री; हिमाचलात भाजपाचा गोंधळ, धुमल-ठाकूर रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 04:25 IST

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेच असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेते म्हणून रूपाणी व उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड झाल्याची घोषणा पक्षाचे निरीक्षक अरुण जेटली यांनी केली.

गांधीनगर/सिमला : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेच असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेते म्हणून रूपाणी व उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड झाल्याची घोषणा पक्षाचे निरीक्षक अरुण जेटली यांनी केली.जेटली म्हणाले की, बैठकीत आम्ही अन्य कोणी इच्छुक आहेत का, वा कोणाला इतर नावे सुचवायची आहेत का, याची विचारणा केली होती, पण या दोघांनाच सर्वांचा पाठिंबा असल्याचे आढळून आहे. भाजपा गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. मात्र, यंदा १८२ जणांच्या विधानसभेत भाजपाचे ९९ आमदारच असतील. हिमाचल प्रदेशात मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत इतका गोंधळ झाला की, त्यात नवे मुख्यमंत्री ठरवताच आले नाहीत. पराभूत झालेले व माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या समर्थकांनी हा गोंधळ घातला. पराभूत झाल्याने त्यांची निवड होण्याची शक्यता कमी असली, तरी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.तिथे निरीक्षक म्हणून गेलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होईल, असे सांगून त्या तेथून बाहेर पडल्या. या गोंधळाविषयी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना काही पत्रकारांनी विचारले असता, ‘आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. दुसरीकडे भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी या गोंधळास धुमल जबाबदार असल्याची टीका केली. ते म्हणाले की, पराभूत धुमल मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ अयोग्य होता. (वृत्तसंस्था)निर्णय अनिश्चित-चार वेळा विजयी झालेले जयराम ठाकूर व आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हेही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. जयराम ठाकूर यांनाच पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री करतील, अशी शक्यता आहे. आजच्या बैठकीत प्रेमकुमार धुमल व ठाकूर यांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या, तसेच धुमल समर्थक आमदारांनी नड्डा व ठाकूर यांच्या नावाला बैठकीत विरोध केला. त्यामुळे निर्णय कधी होणार, हे सांगणे अवघड आहे.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा