नवी दिल्ली- केंद्र सरकारनं विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली आहे. एस. जयशंकर यांचा 28 जानेवारीला कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं त्यांच्या जागी विजय गोखलेंना बढती देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 ते दोन वर्षापर्यंतचा कालावधीसाठी त्यांना परराष्ट्र सचिवपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. विजय केशव गोखले हे 1881 सालच्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. विजय गोखले यांनी चीन, जर्मनी आणि मलेशिया या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.गोखले सद्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) पदावर कार्यरत आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (डीओपीटी) जारी आदेशानुसार, कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने गोखले यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 21:37 IST