पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:10 IST2025-04-27T10:08:18+5:302025-04-27T10:10:06+5:30
जाणकारांच्या मते या बातमीचे फोटो आणि व्हिडीओंमुळे नागरिकांमध्ये बेचैनी वाढत आहे. यामुळे त्यांच्या मनावर गंभीर मानसिक आघात होऊ शकतो. याला सायकोलॉजिकल ट्रॉमा' असेही म्हणतात.

पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भयावह व्हिडीओ अजूनही सोशल मीडियामध्ये शेअर केले जात आहेत. या संदर्भातील बातम्यांचे प्रक्षेपण न्यूज चॅनलवर सतत सुरू आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे नागरिक हादरले आहेत. यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. पुनः पुन्हा हे पाहिल्याने लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जाणकारांच्या मते या बातमीचे फोटो आणि व्हिडीओंमुळे नागरिकांमध्ये बेचैनी वाढत आहे. यामुळे त्यांच्या मनावर गंभीर मानसिक आघात होऊ शकतो. याला सायकोलॉजिकल ट्रॉमा' असेही म्हणतात. (वृत्तसंस्था)
तज्ज्ञांचा सल्ला काय?
हे व्हिडीओ शेअर करणे थांबवा. मुलांना हे व्हिडीओ दाखवू नका. सुरक्षेबाबत दाखवल्या जात असलेल्या नकारात्मक बातम्यांपासून दूर राहा. कुटुंबासोबत चांगले अनुभव आणि आनंदी गोष्टी शेअर करा.
सर्च करणे थांबवा
अतिरेकी कारवाया याबाबत लोक मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर माहिती सर्च करीत आहेत. या माहितीसाठी सर्च करणे हे तुम्ही अस्वस्थ बनल्याचे लक्षण आहे. त्यामुळे हा कंटेट सर्च करणे थांबवावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.
सुरक्षेबाबत चिंता
हे व्हिडीओ पाहून नागरिक सोशल मीडियात व्यक्त होत आहेत. याविरोधात सरकारने आता काहीतरी कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. काश्मीरसंबंधी फोटो आणि व्हिडीओ पाहिल्याने लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. लोक आधीपेक्षा जादा चिंतेत आहेत.
अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचे व्हिडीओ वारंवार पाहिल्याने मन बेचैन होते. खूप राग येतो. हे थांबवण्यासाठी काहीतरी करावेसे वाटते. यामुळे अनेक तास मन अशांत होते. या व्हिडीओंचा मनावर परिणाम प्रत्यक्ष बंदुकीच्या बुलेटच्या हल्ल्याइतकाच होतो.