शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्टेलमध्ये व्हिडीओकांड; मुलीनेच शूट केले, व्हिडीओ; चौकशीचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 08:35 IST

चंडीगड विद्यापीठातील अनेक मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

बलवंत तक्षक

चंडीगड: पंजाबच्या मोहालीतील चंडीगड विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली. ती एमबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने हे व्हिडीओ तिच्या शिमला येथील मित्राला पाठवले होते. ते त्याने सोशल मीडियावरव्हायरल केले. मित्राला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक शिमल्याला रवाना झाले आहे. 

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबत  उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.  पोलीस अधीक्षक विवेकशील सोनी यांनी या घटनेमुळे धक्का बसून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले. संशय आला असता मुलींनी तिला रंगेहाथ पकडले आणि याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिली. ६० हून अधिक मुलींचे व्हिडीओ तिने शूट केल्याचे समजते. चौकशीनंतर मुलीने मित्राच्या सांगण्यावरून आपण हे करत होतो, असे सांगितले.

‘गंभीर आणि लज्जास्पद’ n दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घटना अत्यंत गंभीर व लज्जास्पद असल्याचे सांगितले. यात सहभागी सर्व दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. n या प्रकरणात एक आठवड्याच्या आत सत्य समोर येईल. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी सांगितले. n  राष्ट्रीय महिला आयोगाने  दखल घेत, गुन्हेगारांवर तत्काळ एफआयआर दाखल करा, असे पत्र आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे.

विद्यार्थ्यांची घोषणाबाजी विद्यापीठात सध्या तणाव निर्माण झाला असून, निदर्शने व घोषणाबाजीदरम्यान एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला तर अन्य अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. विद्यापीठात कोणीही सुरक्षित नाही, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले. 

आरोपी मुलीने शिमल्यातील मित्राला जो व्हिडीओ पाठवला तो तिचा स्वत:चा आहे. तिच्या मित्राला अटक केल्यानंतर दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. न्यायवैद्यक विभागाचे लोक तिच्या मोबाइलची तपासणी करत आहेत, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरप्रीत देओ यांनी सांगितले.

टॅग्स :chandigarh-pcचंडीगढ़Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBhagwant Mannभगवंत मान