Video : अभिवादन करताना भाजपा नेते स्टेजवरुन खाली कोसळले, मुख्यमंत्रीही धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:21 PM2021-09-29T16:21:48+5:302021-09-29T16:38:19+5:30

शिवराजसिंह चौहान यांनी जनदर्शन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच, पंजाबमधील परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेसल लक्ष्य केलं

Video: While greeting, BJP leader Kali fell from the stage and the Chief Minister also ran away | Video : अभिवादन करताना भाजपा नेते स्टेजवरुन खाली कोसळले, मुख्यमंत्रीही धावले

Video : अभिवादन करताना भाजपा नेते स्टेजवरुन खाली कोसळले, मुख्यमंत्रीही धावले

Next
ठळक मुद्देशिवराजसिंह समोरील जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन करत होते. त्यावेळी, हे स्थानिक नेतेही हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांना स्टेजचा अंदाजच आला नाही

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये जनदर्शन यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले असून अनेक गावांचा दौरा करत आहेत. लोकांपर्यंत मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी ही जनदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी चौहान आज खारगोने जिल्ह्यात पोहोचले होते. त्यावेळी, व्यासपीठावरुन हात उंचावून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करताना, त्यांच्या शेजारी असलेले भाजपा नेते खालीच कोसळले. 

शिवराजसिंह चौहान यांनी जनदर्शन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच, पंजाबमधील परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेसल लक्ष्य केलं. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूमुळे कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आले. पण, आता सिद्धूनेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वात ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तत्पूर्वी ते उपस्थित असलेल्या खारगोने येथील जनदर्शन यात्रेसाठी व्यासपीठावर जात असताना, स्थानिक नेते खाली पडले. 


शिवराजसिंह समोरील जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन करत होते. त्यावेळी, हे स्थानिक नेतेही हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांना स्टेजचा अंदाजच आला नाही. त्यावेळी, ते पुढे चालत असताना धापकन खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, तात्काळ त्यांना सहकाऱ्यांनी उचलून घेतल्याचे दिसून येते. या नेत्यांस जास्त जखमी झाली नसल्याचेही समजते. 
 

Web Title: Video: While greeting, BJP leader Kali fell from the stage and the Chief Minister also ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.