शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : ... 'तेव्हा राजीव गांधींच्या सासुरवाडीतील मंडळीची करमणूक INS विराट अन् नौदलाला करावी लागली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 23:19 IST

देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानावरुन गांधी परिवारावर हल्लाबोल केला. दिल्लीतील सभेत मोदींनी पुन्हा एकदा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे नाव घेऊन काँग्रेसवर टीका केली. राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेच्या अनावरणावेळी सासरच्यांचे लाड पुरवले, असा घणाघाती आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधीच्या सेवेसाठी नौदलाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप मोदींनी या सभेत केला.  

देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती. मात्र, पिकनिकसाठी जाणाऱ्या गांधी परिवाराच्या स्वागतासाठी ती युद्धनौका देण्यात आली. त्यावेळी, आयएनएस विराट 10 दिवस गांधी परिवार आणि नातेवाईकांना घेऊन पिकनिकसाठी पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या सासरवाडीचेही लोक हजर होते. विदेशी नागरिकांना भारताच्या युद्धनौकेवरुन फिरवणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळणं असंच नाही का? असा प्रश्नही मोदींनी विचारला.

राजीव गांधींना आणि ईटलीवरुन आलेल्या त्यांच्या सासूरवाडीला ही सूट कशी देण्यात आली. गांधी कुटुंबीयांच्या या सुट्टीचा किस्सा एवढ्यावर संपत नाही. गांधी कुटुंबीय ज्या बीचवर (आयलँड) गेले होते, त्या बीचवर सरकार आणि नौसेनेतील जवानांनी त्यांची सेवा केली. सैन्याचे एक विशेष हेलिकॉप्टर दिवस-रात्र त्यांची सेवा करत होता. संपूर्ण प्रशासन या कुटुंबाचे मनोरंजन करत होता. ज्यावेळी, एक कुटुंब देशात सर्वोच्च होते, तेव्हा देशाची सुरक्षा पणाला लावली जाते, त्यावेळी देशातील नागरिकांची चिंताही वाटत नसल्याचं मोदींनी म्हटले.  

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसindian navyभारतीय नौदल