शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - धक्कादायक! बंदुकीच्या धाकावर तरुण इंजिनिअरचे अपहरण करुन जबरदस्तीने लावले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 11:00 IST

आतापर्यंत आपण अनेकदा विवाहाच्या मांडवातून मुलीला पळून नेण्याच्या घटना ऐकल्या आहेत. चित्रपटात तशी दुश्ये पाहिली आहेत. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट एक घटना घडली.

ठळक मुद्देविनोद कुमार असे पीडित इंजिनिअरचे नाव असून तो बोकारो स्टील प्लांटमध्ये ज्यूनियर इंजिनिअर पदावर नोकरीला आहे.मुलीकडच्या बाजूच्या महिला लग्नाच्या विधीमध्ये त्याने सहकार्य करावे यासाठी विनोद कुमारची समजूत घालत होत्या. 

पाटणा - आतापर्यंत आपण अनेकदा विवाहाच्या मांडवातून मुलीला पळून नेण्याच्या घटना ऐकल्या आहेत. चित्रपटात तशी दुश्ये पाहिली आहेत. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट एक घटना घडली. बंदुकीच्या धाकावर एका 29 वर्षीय इंजिनिअरचे अपहरण करुन त्याला लग्नासाठी थेट विवाहाच्या मांडवात आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथील पांडाराक भागात ही धक्कादायक घटना घडली. 

विनोद कुमार असे पीडित इंजिनिअरचे नाव असून तो बोकारो स्टील प्लांटमध्ये ज्यूनियर इंजिनिअर पदावर नोकरीला आहे. अपहरण केल्यानंतर विनोद कुमारला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने विवाहासाठी मांडवात बसवण्यात आले. ही जबरदस्ती सुरु असताना विनोद कुमार अक्षरक्ष: रडून मदतीसाठी याचना करत होता. पण मुलीकडच्या बाजूच्या महिला लग्नाच्या विधीमध्ये त्याने सहकार्य करावे यासाठी विनोद कुमारची समजूत घालत होत्या. 

विनोद कुमारने जेव्हा वधूला कुंकू लावण्याचा विधी करायला नकार दिला तेव्हा मुलीकडचे म्हणाले आम्ही फक्त तुझे लग्न लावत आहोत तुला फासावर लटकवलेले नाही. एका कॉमन मित्राच्या लग्नामध्ये आपली वधूपक्षाकडच्या एका नातेवाईकाबरोबर ओळख झाली तिथे त्या नातेवाईकाने आपल्या डोक्याला बंदुक लावली व लग्नाला भाग पाडले असा आरोप विनोद कुमारने केला आहे. पोलीस विनोद कुमारच्या आरोपांची चौकशी करत आहेत. 

मागच्या महिन्यात जेव्हा ठरल्याप्रमाणे विनोद घरी परतला नाही तेव्हा त्याचा भाऊ संजय कुमारने पोलीस ठाणे गाठले. संजयला एक अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुझ्या भावाचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले आहे अशी माहिती दिली. त्याने ती माहिती पोलिसांना सांगितली. पण पोलिसांनी मदतीला नकार दिला असा आरोप संजयने केला आहे. 

तीन डिसेंबरला माझा भाऊ बोकारो येथून हातिया-पाटणा एक्सप्रेसने पाटण्याजवळ एका लग्नाला गेला होता. तिथे सुरेंद्र यादवबरोबर त्याची भेट झाली. सुरेंद्र यादवने विनोदला मोकाला येथे येण्यासाठी सांगितले. विनोद मोकाला येथे पोहोचल्यानंतर त्याचे अपहरण करुन जबरदस्तीने त्याचे लग्न लावण्यात आले असा आरोप संजयने केला आहे. पोलिसांनी मदत नाकारल्यानंतर संजयने पाटण्याचे पोलीस अधीक्षक मनू महाराज यांची भेट घेतली. त्यांनी आदेश दिल्यानंतर  पांडाराक पोलिसांनी विनोद कुमारची त्या गावातून सुटका केली. लग्नानंतर विनोद कुमारला जबरदस्तीने तिथे ठेवण्यात आले होते.          

                                        

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा