शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अमित शहांच्या कार्यक्रमातून परणाऱ्या पोलीस व्हॅनची 3 तरुणांना धडक; पोलिसांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:14 IST

अपघातानंतर गाडीने पेट घेतला, तरुणाचा होरपळून मृत्यू झाला.

पाटणा: बिहारच्या छपरा-सिवान महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. बिहारपोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसची धडक बसून तीन दुचाकीस्वार ठार झाले. अपघातानंतर बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाल्याने बसला आग लागली आणि यात बसखाली अडकलेला एक तरुण जळून खाक झाला. 

पोलीस पळून गेलेअपघात एवढा भीषण होता की, धडक बसल्यानंतर एक तरुण बससोबत शंभर फूट फरफटत गेला आणि बसखाली अडकला. यादरम्यान, बसच्या पेट्रोल टँकला आग लागून मोठा भडका उडाला. यावेळी बसखाली अडकलेला तरुण जळत राहिला. धक्कादायक बाब म्हणजे, त्या तरुणाला वाचवण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. 

छपरा जिल्ह्यातील रिविलगंज पोलिस स्टेशन अंतर्गत देवरिया गावाजवळ ही घटना घडली. बस सीताबरियारा येथे दिवंगत राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांच्या 120व्या जयंती सोहळ्यातून परतत होती. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. या भीषण अपघातात मृत्यू झालेले तिन्ही तरुण कोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखर भिंडा गावातील रहिवासी होते. मृतांमध्ये बाबूलाल मांझी, कुंदन मांझी आणि तिसचा तरुण मागदेह गावातील रहिवासी होता.

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस