MP News: मध्य प्रदेशची राजधानी इंदूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील खजराणा भागात एका विवाहित महिलेच्या घरात मजा मारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला शेजाऱ्यांनी बेदम चोप दिला. हा एसआय दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसआयला निलंबित करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खजराणा पोलिस ठाण्यात तैनात असलेले एसआय सुरेश बनकर दोन महिन्यांपासून त्या महिलेच्या संपर्कात होते. महिलेचा तिच्या पतीशी वाद सुरू होता. त्यामुळेच एसआय बनकरची महिलेशी जवळीक वाढली आणि तिच्या घरी येणे सुरू झाले.
आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरेश बनकर महिलेच्या घरी असताना स्थानिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. स्थानिकांचा आरोप आहे की, सुरेश दारू पिऊन शिवीगाळ करत होता. त्याची आक्षेपार्ह अवस्था पाहून लोक संतप्त झाले आणि त्यांनी त्याला बांधून काठ्यांनी बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच खजराणा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एसआयला गर्दीतून सोडवले. पोलिसांनी काही महिलांनाही ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुरेश बनकर याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.