VIDEO: अहमदाबादमध्ये काँग्रेस आमदाराचं चपलांचा हार घालून केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 01:24 PM2017-10-05T13:24:40+5:302017-10-05T13:29:34+5:30

अहमदाबादच्या स्थानिक आमदाराचं एका व्यक्तीने चपलांचा हार घालून स्वागत केल्याची घटना समोर आली आहे.

VIDEO: A person welcomed the Congress candidate in Ahmedabad by throwing a slap on his face | VIDEO: अहमदाबादमध्ये काँग्रेस आमदाराचं चपलांचा हार घालून केलं स्वागत

VIDEO: अहमदाबादमध्ये काँग्रेस आमदाराचं चपलांचा हार घालून केलं स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देअहमदाबादच्या स्थानिक आमदाराचं एका व्यक्तीने चपलांचा हार घालून स्वागत केल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या दरियापूरचे आमदार गयासुद्दीन शेख बुधवारी शाहपूरला गेल्यावर तेथे एका व्यक्तीने त्याचं स्वागत चप्पल-बुटांचा हार घालून केलं.

अहमदाबाद- अहमदाबादच्या स्थानिक आमदाराचं एका व्यक्तीने चपलांचा हार घालून स्वागत केल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या दरियापूरचे आमदार गयासुद्दीन शेख बुधवारी शाहपूरला गेल्यावर तेथे एका व्यक्तीने त्याचं स्वागत चप्पल-बुटांचा हार घालून केलं. बाईकवरून येणाऱ्या या आमदाराच्या गळ्यात आधीपासूनच फुलांच्या अनेक माळा घातलेल्या होत्या. त्याचवेळी तेथे पोहचलेल्या एका माणसाने आमदार गयासुद्दीन शेख यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली. आमदार गयासुद्दीन शेख यांनी त्यांच्या मतदारसंघातून महागाई आणि भ्रष्टाचार विरोधात रॅली काढली होती. त्या रॅलीसाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. सादिक ताकळी नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा शेख यांनी केला आहे.

माझ्याबरोबर अशी काही घटना घडेल याचा अंदाज नसल्याचं आमदार गयासुद्दीन शेख यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीने माझ्या गळ्यात चपलांचा हार घातला तो व्यक्ती झुगाराचा धंदा चालवायचं बेकायदेशीर काम करत होता. ते काम मी बंद पाडलं होतं, म्हणूनच त्याने हे कृत्य केलं असावं, असं आमदार गयासुद्दीन शेख यांनी म्हंटलं आहे. मला चपला-बुटांचा हार घालणार व्यक्ती माझ्या खूप जवळ होता, असंही ते पुढे म्हणाले. 

चपलांचा हार घालणारा व्यक्ती माझ्या मित्रासारखा होता. पण तो करत असलेल्या बेकायदेशीर कामाबद्दल मला माहिती मिळाल्यानंतर मी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. माझ्या तक्रारीनंतर त्याचे बेकायदेशीर धंदे बंद झाले, असं गयासुद्दीन शेख यांचं म्हणणं आहे. माझ्या विभागातील लोक दारू आणि झुगाराबद्दल असलेलं माझं मत जाणतात, असंही ते म्हणाले आहेत.

सादिक ताकळी या माझ्या विभागातील गुन्हेगार आहे. त्याचा अवैध दारूचा व्यवसाय असून त्या विरोधात मी आवाज उठवल्याने त्याने हे कृत्य केलं. अशा गुन्हेगारांची मला अजिबात भीती वाटत नाही. त्या रॅलीमध्ये शेकडो लोक माझ्यासाठी फुलं घेऊन आले होते, त्यामुळे एका व्यक्तीच्या वागण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नसल्याचं आमदार गयासुद्दीन शेख यांनी सांगितलं.  गुजरातमध्ये भाजपा नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना आहे.

संतापलेल्या लोकांनी भाजपा नेत्याला नेलं फरफटत, झाडाला बांधून केली मारहाण
गुजरातमध्ये भाजपा नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली. वडोदरा शहरातील बोपड येथे ही घटना घडली. झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी सत्तेत असणा-या भाजपा नगरसेवक हसमुख पटेल यांना झाडाला बांधून मारहाण करत आपला संताप व्यक्त केला. हसमुख पटेल यांना झाडाला बांधल्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला असून यामध्ये लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हसमुख पटेल यांचा पांढरा शर्ट फाटलेला दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना अटक केली. 


 

Web Title: VIDEO: A person welcomed the Congress candidate in Ahmedabad by throwing a slap on his face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.