VIDEO - भारताने क्षेपणास्त्र डागून उडवला पाकिस्तानी बंकर

By Admin | Updated: May 8, 2017 12:41 IST2017-05-08T12:41:44+5:302017-05-08T12:41:44+5:30

पाकिस्तानने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करण्याचे अमानवी कृत्य केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

VIDEO - Pakistanis bunker missile missile | VIDEO - भारताने क्षेपणास्त्र डागून उडवला पाकिस्तानी बंकर

VIDEO - भारताने क्षेपणास्त्र डागून उडवला पाकिस्तानी बंकर

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 8 - पाकिस्तानने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करण्याचे अमानवी कृत्य केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताकडून पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात असल्याचा दाखवणारा हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
या व्हिडीओमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ असणारी पाकिस्तानी चौकी भारतीय लष्कराने क्षेपणास्त्र डागून उडवून दिल्याचे दिसत आहे. एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा व्हिडीओ मागच्या महिन्यातील असून, हे नेमके कुठले स्थान आहे ते स्पष्ट झालेले नाही. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्य जरब बसवण्यासाठी घातक शस्त्रास्त्रांनी उत्तर देत आहे. 
 

Web Title: VIDEO - Pakistanis bunker missile missile