Video: जेव्हा रस्त्यावर येते हरणांची लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 15:23 IST2021-07-29T15:23:33+5:302021-07-29T15:23:40+5:30
Black Bucks: गुजरातच्या नॅशनल पार्कमध्ये हरणांचा रस्ता पार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: जेव्हा रस्त्यावर येते हरणांची लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडिओ
भावनगर:गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील ब्लॅकबक नॅशनल पार्क (काळा हरीण राष्ट्रीय उद्यान) जवळ शेकडो हरणांचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा व्हिडिओ शेअर करत, 'उत्कृष्ट' असे कॅप्शन दिलंय. रस्ता पार करणाऱ्या या हरणाच्या कळपाचा व्हिडिओ गुजरात सूचना विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन बुधवारी शेअर करण्यात आलाय.
Excellent! https://t.co/9xxNLllQtP
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2021
हा व्हिडिओ पोस्ट करताना "अंदाजे 3,000 काळे हरिण भावनगरच्या ब्लॅकबक नॅशनल पार्कमध्ये रस्ता ओलांडताना दिसले," असं कॅप्शन सूचना विभागाने लिहीलं. सूचना विभागाकडून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ एका मिनीटाचा असून पाण्याच्या लाटेप्रमाणे हरणं उड्या मारत रस्ता पार करताना दिसत आहे.
वन रक्षकाने शेअर केला व्हिडिओ
राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकारी अंकुर पटेल यांनी सांगितले की, हा व्हिडिओ जीआरडी दलातील एका जवानाने काढला आहे. त्या जवानाची तैनाती धोलेरा-भावनगर राजमार्गावर होती. रात्रीची ड्युटी संपवून तो जवान सकाळी आपल्या घराकडे जात असताना त्याला या हरणांचा कळप दिसला. हे सुंदर दृष्य पाहताच त्या जवानाने आपल्या मोबाईलमध्ये हे दृष्य कैद केले.