VIDEO: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा रोमँटिक डान्स; प्रेक्षकांकडून टाळ्यांची साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:17 IST2025-02-16T17:14:57+5:302025-02-16T17:17:35+5:30
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुलाच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा रोमँटिक डान्स; प्रेक्षकांकडून टाळ्यांची साथ
Shivraj Singh Chauhan Dnace Video:मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे नेहमीच त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्वामुळे चर्चेत असतात. अशातच आता केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा कुणाल सिंह चौहान याने रिद्धी हिच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नसमारंभानंतर शिवराज सिंह चौहान यांनी त्यांची पत्नी साधना यांच्यासह रोमँटिक डान्स केला. त्यांच्या डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा कुणाल सिंह चौहान विवाहबंधनात अडकला. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बडे नेते भोपाळला पोहोचले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह मध्य प्रदेशातील अनेक बडे नेतेही त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.
कुणाल सिंह यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी भोपाळमधील नीलबाद भागातील वाना ग्रीन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्नी साधना यांच्यासह जोरदार डान्स करताना दिसत आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी पत्नीसह जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा या गाण्यावर डान्स केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
मामा जी का डांस🔥🔥
— Yati Sharma (@yati_Official1) February 15, 2025
केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान जी के पुत्र की शादी में मामा जी के डांस पर बाजी जोरदार तालियां वह मामा जी वह क्या बात है 😇🥳🥳
पुत्र की शादी की बहुत-बहुत बधाई💐
कमेंट करके बताएं मामा जी का डांस आपको कैसा लगा pic.twitter.com/Zwpn0cqvtx
याआधी कुणाल यांच्या हळदीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता ज्यामध्ये शिवराज सिंह चौहान हे डान्स करत होते. शिवराज सिंह चौहान पत्नी साधना चौहानसोबत 'मैं जट यमला पगला दीवाना' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. यावेळी शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या लग्नाचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये शिवराज सिंह चौहान हे मंत्री म्हणून नाही तर वडील म्हणून आनंद व्यक्त करत होते.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या मुलाची आणि सुनेची फोटो शेअर केले आहेत. "देवाच्या कृपेने, पूर्वजांचे आशीर्वाद आणि सर्व प्रियजनांच्या शुभेच्छा, मुलगा कुणाल आणि रिद्धीचा आशीर्वाद सोहळा आज आनंदात पार पडला. रिद्धी सून नव्हे तर मुलगी म्हणून घरी येत आहे. आमच्या कुटुंबात स्वागत करताना आमचे मन अभिमानाने आणि आनंदाने भरले आहे," असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं.