शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Video : खोटं बोलला म्हणून पोटच्या पोराला अमानुष मारहाण, वडिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 12:06 IST

पुन्हा खोटं बोलणार नाही, असं म्हणत हा मुलगा आपल्या चुकीबद्दल वडिलांकडे माफी मागतो, पण त्याच्याकडे आणि आईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वडील त्याला गादीवर उचलून फेकतात, दोन-तीन वेळेस गादीवर आपटल्यानंतर ते त्याला गादीवरून थेट खाली उचलून आपटतात. इतक्यावरच न थांबता खाली पडलेल्या आपल्याच मुलाला हा बाप लाथ मारून निघून जातो.  

बंगळुरू :  बंगळुरूमध्ये एका पित्याने आपल्याच 10 वर्षाच्या  मुलाला पट्टयाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय पित्याला अटक करण्यात आली आहे. 

लहान मुलं आपली एखादी लहानशी चूक लपवण्यासाठी अनेकदा खोटं बोलतात. खोटं बोलल्याचं समजल्यावर आई-वडिलांकडून त्याला ओरडा बसतो, पुन्हा खोटं बोलू नये यासाठी त्याची समजूत काढली जाते, तर कधी फटके देखील बसतात. पण वडिलांशी खोटं बोलणं पश्चिम बंगळुरुच्या केंगेरी परिसरातील या चिमुकल्याला इतकं महागात पडलं की त्याच्या बापाने त्याला अक्षरशः पट्ट्याने अमानुष मारहाण करण्यास सुरूवात केली. बेदम मारहाण करताना पाहून मुलाच्या आईने मारझोड थांबवण्याची विनंती केली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.  

पुन्हा खोटं बोलणार नाही, असं म्हणत हा मुलगा आपल्या चुकीबद्दल वडिलांकडे माफी मागतो, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वडील त्याला गादीवर उचलून फेकतात, दोन-तीन वेळेस गादीवर आपटल्यानंतर ते त्याला गादीवरून खाली उचलून आपटतात. इतक्यावरच न थांबता खाली पडलेल्या आपल्याच मुलाला हा बाप लाथ मारून निघून जातो.  

ही घटना दोन महिन्यापूर्वीची असून, मुलाच्या आईनेच व्हिडीओ बनवल्याची माहिती आहे. आईचा मोबाईल खराब झाल्यावर मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता.  मोबाईलमधील डेटा डिलीट करु नये, अशी विनंती कंपनीकडे त्यांनी केली होती. त्यावेळी सर्व्हिस सेंटरमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहिल्यावर त्याने याची माहिती तात्काळ एका स्वयंसेवी संस्थेला दिली आणि अखेर शनिवारी सकाळी मारहाण करणा-या पित्याला पोलिसांनी अटक केली.

पाहा व्हिडीओ -  

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस