लय भारी Video! टोळधाडीचा बदला; चक्क टोळाकडूनच शेतात नांगर चालवून घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:39 PM2020-06-09T12:39:02+5:302020-06-09T12:41:29+5:30

पाकिस्तानी सीमेतून राजस्थानात शिरलेल्या वाळवंटी टोळांनी देशभर धुमाकूळ घातला होता. दिवसाला २२ किमीच्या वेगाने हे टोळ प्रचंड संख्येने पिकांवर तुटून पडले होते.

Video! Locust revenge; plowing in the field from the locusts | लय भारी Video! टोळधाडीचा बदला; चक्क टोळाकडूनच शेतात नांगर चालवून घेतला

लय भारी Video! टोळधाडीचा बदला; चक्क टोळाकडूनच शेतात नांगर चालवून घेतला

Next

गेल्या महिन्यात देशभरातील लाखो हेक्टरवरील पिके टोळधाडीमुळे नष्ट झाली. या टोळांनी मुंबईसह महाराष्ट्रातील पिकांवरही आक्रमण करत नासधूस केली. याचा बदला एका तरुणाने घेतला आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर कमालीचा व्हायरल होत आहे. 


पाकिस्तानी सीमेतून राजस्थानात शिरलेल्या वाळवंटी टोळांनी देशभर धुमाकूळ घातला होता. दिवसाला २२ किमीच्या वेगाने हे टोळ प्रचंड संख्येने पिकांवर तुटून पडले होते. ही २६ वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड होती. या टोळधाडीला नियंत्रित करण्यासाठी आता हवाईदलाने कंबर कसली असून हेलिकॉप्टरद्वारे औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक प्रशासनानेही फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ही टोळ धाड पुढे सरकू लागली आहे. 


पाकिस्तानात काही सापडेना...
टोळधाड ताशी १५ ते २० कि.मी. वेगाने प्रवास करून एका दिवसात १५० कि.मी.चे अंतर पार करते. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत.


उभीच्या उभी हाता तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त केल्याने एका तरुणाने या टोळाला पकडून त्याला नांगराला जुंपले आहे. याचा व्हिडीओ एका पोलिस अधिकाऱ्याने व्हायरल केला आहे. या व्हिडीओला कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. 



काही लोकांनी यावर गमतीदार मेसेजही केले आहेत. एकाने मनरेगाचा उल्लेख करत मनरेगाशिवाय जेवन मिळत नसल्याचे म्हटले आहे. तर अन्य एकाने टोळ हक्क आयोगाने मानवावर गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले आहे. 

पाच राज्यांचे मोठे नुकसान
मध्यप्रदेशातील मालवा भागात टोळधाड आल्या आहेत. च्महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यातील शेतकºयांना टोळधाडीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या राज्यांमध्ये टोळ नियंत्रण अभियान सुरु करण्यात येत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus दिल्ली संकटात! कोरोना खतरनाक स्टेजमध्ये; चार व्यक्तींमागे एक पॉझिटिव्ह

Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले

चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

 

Web Title: Video! Locust revenge; plowing in the field from the locusts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.