पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीपूर्वी कोलकातामध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले, सुरुवातीला वाद झाला, या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत आणि दगडफेकीत झालं. या धक्कादायक घटनेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजपा कार्यकर्त्यांनी बंगालच्या मंत्री डॉ. शशी पांजा यांच्या गिरीश पार्क परिसरातील कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये अनेक टीएमसी कार्यकर्ते जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे भाजपाने हे आरोप फेटाळून लावले आणि दावा केला आहे की, पंतप्रधान मोदींच्या रॅलीला जाणाऱ्या भाजपाच्या गाड्यांवर टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या हल्ल्यात भाजपाचे उत्तर कोलकाता जिल्हाध्यक्ष तमोघ्न घोष यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Web Summary : A major clash broke out between BJP and TMC workers in Kolkata ahead of PM Modi's rally, escalating into stone pelting. Both parties accuse each other of instigating violence, resulting in injuries on both sides and heightened tensions.
Web Summary : कोलकाता में पीएम मोदी की रैली से पहले भाजपा और टीएमसी कार्यकर्ताओं में झड़प हो गई, जो पत्थरबाजी में बदल गई। दोनों दलों ने एक-दूसरे पर हिंसा भड़काने का आरोप लगाया है, जिससे दोनों पक्षों के कार्यकर्ता घायल हुए हैं और तनाव बढ़ गया है।