Rahul Gandhi UP Visit:उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे काँग्रेसन नेते राहुल गांधी आणि योगी सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यात जोरदार वादावादी झाली. राहुल १० आणि ११ सप्टेंबर रोजी रायबरेलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. या वादाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
रायबरेली येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची बैठक सुरू होती. मंत्री दिनेश प्रताप सिंह आणि राहुल गांधींच्या शेजारी बसले होते. यावेली दोघांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला. राहुल गांधी म्हणाले की, मी बैठकीचे अध्यक्षपद भूषवत आहे. तुम्हाला(दिनेश प्रताप सिंह) काही सांगायचे असेल तर आधी विचारा, मग मी तुम्हाला बोलण्याची संधी देईन. यावर मंत्री संतापले आणि दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला.
अमेठीचे खासदार देखील उपस्थित मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत दिशाच्या कार्यक्षेत्राबाबत चर्चा सुरू होती. यादरम्यान राहुल गांधींनी एका मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले की, मी आधीच विचारायला हवे होते. यावर मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी आक्षेप घेतला आणि म्हणाले की, तुम्ही निश्चितच अध्यक्ष आहात, पण तुम्ही जे काही बोलता, ते मी स्वीकारण्यास बांधील नाही. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. अमेठीचे खासदार केएल शर्मा देखील बैठकीत उपस्थित होते. तेदेखील राहुल गांधींसह दिनेश प्रताप सिंह यांच्याशी वाद घालताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिनेश प्रताप सिंह २०१८ पर्यंत काँग्रेसचा भाग होतेदिनेश प्रताप सिंह २०१८ पर्यंत काँग्रेस पक्षाचा भाग होते. २०१० आणि २०१६ मध्ये ते दोनदा उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाले आणि २०१८ मध्ये दिनेश प्रताप सिंह यांनी पक्ष बदलला. २०१९ मध्ये त्यांनी रायबरेली येथून सोनिया गांधींविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०२४ मध्ये त्यांना त्याच जागेवर राहुल गांधींविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.