शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालंय; भाजप प्रवक्त्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:54 IST

Ruchi Pathak Controversial Statements: भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.

ठळक मुद्दे भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.

भाजपच्या एका महिला प्रवक्त्यानं (Spokeperson) भारताच्या स्वातंत्र्याबद्दल मोठा दावा केला आहे. एका मीडिया डिबेटदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांनाच धक्का बसला."भारताला स्वातंत्र्य आता मिळालंच नाही. भारताला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर मिळालं आहे. देश हा पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला होता," असं अजब वक्तव्य झांसीमधील भाजप प्रवक्त्या रूची पाठक (BJP Spokeperson Ruchi Pathak) यांनी केलं. यानंतर अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर टीका करण्यात आली. 

सोशल मीडियावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. अनेकांनी त्यांना व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचं टॉपर असं संबोधलं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी माघार घेतल्याचं दिसून आलं. आपल्याला जी माहिती मिळाली ती सोशल मीडियाद्वारे (Social Media) मिळाल्याचं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. झांसीमध्ये लल्लनटॉपनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या रुची पाठकही उपस्थित होत्या. यावेळी खासगीकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या विक्रीचाही उल्लेख केला. यावेळी भाजपनं आपली बाजू मांडली. "भारताचं स्वातंत्र्य हे काँन्ट्रॅक्ट बेस आहे. काँग्रेसने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य घेतचलं आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. ब्रिटीश कायद्याची शपथ घेण्यात आली होती. निवडणुका नंतर घेण्यात आल्या आणि १९५१ मध्ये भारताचं संविधान लागू करण्यात आलं," असंही त्या यावेळी म्हणाल्या. भारताचं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच काही नेटकऱ्यांनी त्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या टॉपस असल्याचं म्हटलं. यानंतर रूची पाठक यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारत