शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Biparjoy Cyclone : कर्तव्यनिष्ठेला सलाम! बिपरजॉय चक्रीवादळात पोलिसाने 4 दिवसांच्या बाळाला सुरक्षित स्थळी नेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:41 IST

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बचाव यंत्रणांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे.

गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बचाव यंत्रणांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. गुजरातमधील बर्दा डुंगर येथे अशाच एका घटनेत अवघ्या चार दिवसांपूर्वी मुलाला जन्म देणाऱ्या मातेला पोलिसांनी सुरक्षित स्थळी पाठवलं आहे. एक महिला पोलीस कर्मचारी नवजात बाळाला हातात घेऊन जाताना दिसली. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

गुजरातचे वन आणि पर्यावरण मंत्री मुलू अय्यर बेरा यांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस नवजात बाळाला आपल्या कुशीत घेऊन जाताना दिसत आहे. तर बाळाची आई आणि इतर अनेक महिला त्यांच्यासोबत सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतात. भंवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेरा यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये "सेवेद्वारे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भंवड प्रशासन सतर्क आहे. तुम्ही GujaratPolice सोबत असाल, तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित हातात आहात" असं म्हटलं आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. वादळामुळे अनेक विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळ बिपरजॉयची लँडफॉल प्रक्रिया सुरू झाली आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे 125 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गुजरातच्या ज्या भागात हे चक्रीवादळ सागरी किनार्‍यावर धडकत आहे, तिथे एक वृद्ध जोडपं राहतं ज्यांनी चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे. 

एकदा दोनदा नव्हे तर 'या' वृद्ध जोडप्याने चक्रीवादळात तीनदा गमावलं घर; बिपरजॉयवर म्हणतात...

गुजरातमधील जाखाऊ येथील एका जोडप्याने अनेक वेळा त्यांचं घर पुन्हा बांधलं आहे. हवाबाई आणि उस्मान, दोघेही 70 वर्षांचे आहेत. ते सध्या जखाऊ जवळील निवारागृहात आहेत ज्यांना किनार्‍याजवळच्या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. उस्मान म्हणाले, "आमच्याकडे पक्कं घर नसल्यामुळे, आम्ही यापूर्वी चक्रीवादळात आमचं घर कोसळताना आणि उडताना पाहिलं आहे." या दाम्पत्याचा उदरनिर्वाह शेतीतून होतो. त्यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी त्यांच्या कमाईने आणि मुलांच्या मदतीने त्यांनी घर पुन्हा बांधलं.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळGujaratगुजरातPoliceपोलिस