शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पतीवर चालून आलेल्या हल्लेखोरांना तिने लावलं पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 12:58 IST

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चार-पाच जण आबिदल अली नावाच्या पत्रकाराला मारहाण करताना दिसत आहेत. या हल्लेखोरांना उत्तर देण्यासाठी त्या पत्रकाराच्या पत्नीने मोठं धाडस दाखविलं आहे. पत्रकाराच्या पत्नीने घरातून रिवॉल्व्हर आणून त्या हल्लेखोरांवर फाररिंग सुरू केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. गोळीबार सुरू होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. 

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ लखनऊच्या काकोरी भागातील आहे. एक व्यक्ती पत्रकार आबिद अली यांच्या घराबाहेर उभा असलेला पाहायला मिळतो आहे. त्या व्यक्तीच्या हातात काही कागदपत्र आहेत. सुरूवातीला लॉक असलेल्या गेटमधून आबिद त्या व्यक्तीशी बोलत होते. नंतर त्यांनी घरातून चावी आणून दरवाज्याचं लॉक उघडलं. दोघांमध्ये काही संभाषण झालं. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती अत्यंत साधारण दिसतो आहे. ही व्यक्ती पत्रकारावर हल्ला करेल असं कुठेही वाटत नव्हतं. 

काही वेळाने आणखी चार लोक पत्रकाराच्या घराबाहेर आली आणि त्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर आबिद अली यांना खेचून घराबाहे नेताना दिसत आहेत. हल्लेखोरांनी लाथा-बुक्क्यांनी आबिद यांना मारहाण केली. त्यातील एकाने मोठ्या काठीने त्यांना मारहाण केली. आबिद यांचा आवाज ऐकुन त्यांची पत्नी हातात रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आल्याचं पाहायला मिळालं. सुरूवातीला आबिद यांना सोडण्याची विनंती त्यांच्या पत्नीने केली पण तरीही मारहाण बंद न झाल्याने त्यांनी फायरिंग करायला सुरूवात केली. पत्नीने सुरू केलेली फायरिंग पाहता त्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश