शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: विमानतळावर सीआरपीएफ जवानांसाठी टाळ्यांचा कडकडाट, लोकांनी व्यक्त केलं प्रेम आणि आदर

By शिवराज यादव | Updated: October 9, 2017 15:00 IST

जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान दिसताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. 

ठळक मुद्देजम्मू विमानतळावर सीआरपीएफ जवान दिसताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केलाहे सर्व जवान श्रीनगरला चालले होतेसोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे

श्रीनगर - आपल्या सर्व इच्छा, कुटुंब मागे सोडून देशवासियांच्या सुरक्षेसाठी सीमारेषेवर उभं राहून आपल्या जीवाची बाजी लावतो तो म्हणजे जवान. भारतीय लष्करातील या जवानांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक देशवासियाच्या मनात आदर आहे, आणि तो असलाच पाहिजे. पण अनेकदा हे प्रेम किंवा कौतुक फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकताना दिसत असतं. पण जम्मू विमानतळावरील घटनेमुळे दृश्य बदलू लागल्याचं दिसत आहे. जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान दिसताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. 

जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची एक तुकडी दाखल झाली होती. बोर्डिंगसाठी हे सर्व जवान रांगेत उभे होते. हे सर्व जवान श्रीनगरला चालले होते. जवानांनी विमातळावर प्रवेश करताच विमानाच्या प्रतिक्षेत बसलेल्या प्रवाशांनी उभं राहून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी जवानांचे धन्यवाद मानत त्यांच्याप्रती आदर, प्रेमभावना व्यक्त केल्या. लोकांनी पाठीवर दिलेली ही कौतुकाची थाप पाहून जवानांच्या चेह-यावरही आनंद दिसत होता. ही घटना 8 ऑक्टोबरची आहे.

अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्यास सुरुवात केली. काही जवानांनीदेखील व्हिडीओ शूट करत आठवण जपून ठेवली. सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

याआधी दिल्लीत अशी घटना पहायला मिळाली होती. दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय जवानांचं टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक करण्यात आलं होतं. लोकांकडून असं जाहीर कौतुक होण्याची ही कदाचित देशातील पहिलीच घटना असावी. हे जवान विमानतळावर पोहोचले असता लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. अशाप्रकारे मिळणारा आदर आणि कौतुक पाहून जवानही भारावून गेले होते. मेजर गौरव आर्या यांनी विमानतळावरील व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओही व्हायरल झाला होता.  'भारतीय जवान यूएन मिशनवरुन परतले होते. दुपारी तीन वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानळावर त्यांचं आगमन झालं. यावेळी उपस्थित प्रवासी आणि कर्मचा-यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. भारतात हे असं होताना मी कधीच पाहिलेलं नाही. हे खूपच विलक्षण आहे. मला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे', अशी प्रतिक्रिया मेजर गौरव आर्या यांनी दिली होती.