शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: द्वारकाधीशांच्या दर्शनाला आले सरन्यायाधीश; पोलिसांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 20:20 IST

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यापुढे मंदिरातून बाहेर आलेले पोलीस पायात बुट घालण्यासाठी चांगलीच धावपळ करताना व्हिडिओत दिसून येतात.

नवी दिल्ली - देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आज गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांचा मंदिरात जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. या व्हिडिओत ते पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान करुन सपत्नीक द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या दर्शनासाठी जात असल्याचं दिसून येतं. सरन्यायाधीश येत असल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यापुढे मंदिरातून बाहेर आलेले पोलीस पायात बुट घालण्यासाठी चांगलीच धावपळ करताना व्हिडिओत दिसून येतात. सरन्यायाधीशांसमोर पुजारीही धावताना दिसून येतात, तर सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही दिसून येतो. जामनगर आणि द्वारका या दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी व सुरक्षा अधिकारी त्यांच्या सेवेत व सुरक्षेत तैनात होते.

जिल्हाधिकारी अशोक शर्मा आणि पोलीस अधीक्षक नितेश पांडेय यांनी सीजेआय चंद्रचूड यांचे स्वागत केले. सरन्यायाधीशांनी सपत्नीक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहणही केले. मंदिरातील पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या चरण पादुकांची पूजा केली. सोमनाथ मंदिरातही त्यांच्याकडून पूजा-आरती करण्यात येणार होती. ते राजकोटहून सोमनाथ मंदिरासाठी निघालेही होते. मात्र, त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं नाही. त्यामुळे, त्यांच्या शेड्युलमध्ये बदल करावा लागला. त्यानंतर, त्यांनी द्वारकाधीश मंदिरात येऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. दरम्यान, राजकोटमध्ये ११० कोटी रुपये खर्चून नवीन उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे, या इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यासाठी, ते गुजरात दौऱ्यावर होते. कलावाद रोडवरील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी मुक्काम केला.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयPoliceपोलिसGujaratगुजरात