शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून असदुद्दीन ओवैसींच्या घरावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 09:41 IST

ओवैसींच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच नवी दिल्लीचे पोलीस प्रमुख घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देओवैसी हे माध्यमांमध्ये चर्तेत राहण्यासाठी सातत्याने हिंदूविरोधी विधान करतात. त्यामुळेच, उत्तर प्रदेशात त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या भावालाही या कारणाने अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली - एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील 24 अशोक रोड येथील निवासस्थानी हल्ला करण्यात आला आहे. हिंदू सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या घराबाहेरील नेमप्लेट, लॅम्प आणि काचाही फोडल्या आहेत. 

ओवैसींच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच नवी दिल्लीचे पोलीस प्रमुख घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिंदू सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्याबात संघटनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ओवैसी आणि त्यांच्या बंधुंच्या विधानामुळे कार्यकर्ते संतप्त असल्याचं त्यांनी म्हटलंय.  ओवैसी हे माध्यमांमध्ये चर्तेत राहण्यासाठी सातत्याने हिंदूविरोधी विधान करतात. त्यामुळेच, उत्तर प्रदेशात त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या भावालाही या कारणाने अटक करण्यात आली होती. एका विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये आपली क्रेझ निर्माण करण्यासाठी सातत्याने हिंदूचा कमीपणा करण्याचं काम ओवैसींकडून होत आहे. म्हणून, ओवैसींनी त्यांच्या भाषणात हिंदूविरोधी विधान करू नयेत, हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असे आवाहनही विष्णू गुप्ता यांनी केलंय. 

भाजपच जबबदार - ओवैसी

दरम्यान, लोकांच्या या कट्टरतेसाठी भाजपच जबाबदार आहे. जर एका खासदाराच्या घरावर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर, यातून काय संदेश जातो? असा प्रश्न ओवैसी यांनी हल्ल्यानंतर विचारला आहे. ते सध्या युपी दौऱ्यावर असून येथील नेते शिवपाल यादव यांची भेट घेणार आहेत.   

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHinduहिंदू