VIDEO- अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना, पुन्हा एकदा विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 13:11 IST2017-12-08T09:26:14+5:302017-12-11T13:11:48+5:30
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

VIDEO- अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना, पुन्हा एकदा विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण
मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विराट-अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा असताना गुरूवारी रात्री उशिरा अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का तिच्या कुटुंबीयांसह इटलीला जात असल्याची चर्चा आहे.
#WATCH: Anushka Sharma and her family spotted at Mumbai's Chhatrapati Shivaji International Airport, last night, amid speculations of wedding in Italy pic.twitter.com/fLA1SM2NDz
— ANI (@ANI) December 8, 2017
अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत गुरूवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का तिची आई आशिमा शर्मा आणि वडील अजय कुमार शर्मा यांच्यासोबत दिसली. त्यावेळी मोठा भाऊ कर्णेश शर्माही त्यांच्यासोबत होता. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळावर फक्त अनुष्का आणि तिचे कुटुंबीयच दिसले. परंतु विराट त्यांच्यासोबत नव्हता.
इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लग्नासाठी अनुष्का आणि विराट थेट इटलीला जाणार नाही. अनुष्काने गुरूवारी रात्री उशिरा मुंबईहून दुबईला उड्डाण केलं आहे. दुबईमध्ये लग्नाची खरेदी केल्यानंतर पुढील टप्पा सिंगापूर असेल. सिंगापूरमध्ये एक दिवस थांबल्यानंतर दोघे लंडनला जाणार आहे. तिथून 12 डिसेंबरला ते इटलीला पोहोचतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
अनुष्का माध्यमांसमोर तिच्या इटली दौऱ्याविषयी काही खुलासा करणार का, याकडेच अनेकांचं लक्ष लागलं होतं. पण, अनुष्काने विमानतळावर बोलणं टाळलं.