VIDEO: गुजरातमध्ये अमित शाह यांच्या गाडीवर फेकली अंडी

By admin | Published: March 7, 2017 01:51 PM2017-03-07T13:51:26+5:302017-03-07T14:05:23+5:30

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या गाडीवर अंडे फेकण्यात आले आहेत .

VIDEO: Amit Shah's egg thrown on the car in Gujarat | VIDEO: गुजरातमध्ये अमित शाह यांच्या गाडीवर फेकली अंडी

VIDEO: गुजरातमध्ये अमित शाह यांच्या गाडीवर फेकली अंडी

Next
ऑनलाइन लोकमत  
अहमदाबाद, दि. 7 - गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली आहेत . पाटीदार समाजातील काही लोकांनी शाह यांच्या गाडीवर अंडे फेकले. 
 
अमित शाह यांचा ताफा सोमनाथला जात असताना जुनागडच्या केशोदजवळ शाह यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली. त्यांचा ताफा जात असताना रस्त्यात काही पाटीदार समाजाचे लोकं उभी होती त्यांनी ताफ्यावर अंडी फेकली. 
 
आज अमित शाह पंतप्रधान मोदींसोबत सोमनाथमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यासाठीच त्यांचा ताफा सोमनाथकडे निघाला होता. रात्री जवळपास 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. अंडे फेकण्यास सुरूवात होताच गाड्यांचा वेग काही वेळासाठी मंदावला मात्र लगेच वेग वाढला.    
 
काही दिवसांपूर्वी आरक्षणाची मागणी करणा-या पाटीदार समाजावर लाठीमार करण्यात आला होता. पाटीदार आंदोलनाचे नेता हार्दिक पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनी अमित शाह यांच्या इशा-यावरच लाठीमार झाल्याचा आरोप केला होता त्यामुळे त्यांच्यावर अंडी फेकण्यात आल्याची शक्यता आहे. 
 

Web Title: VIDEO: Amit Shah's egg thrown on the car in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.