उत्तर प्रदेशमधील अयोध्यामधील एका बेवारस पडलेल्या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कॅन्सरग्रस्त आजीला रस्त्यावर सोडून नातेवाईक निघून गेल्याचे व्हिडीओत दिसतंय. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
रामनगरी अयोध्येच्या किशुन दासपूर भागात, एका वृद्ध महिलेला तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला सोडून दिले. महिलेला रिक्षातून आणण्यात आले आणि एका निर्जन रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
सीसीटीव्हीत नातेवाईक दिसले
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेला घेऊन आलेला पुरूष आणि महिला तिचे स्वतःचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. पीडिता कर्करोगाने ग्रस्त होती आणि तिची प्रकृती सतत खालावत होती. तिच्यावर उपचार करण्याऐवजी, कुटुंबाने त्या वृद्ध महिलेला रस्त्यावर सोडण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले
ही वृद्ध महिला अशक्त आहे. त्या महिलेला स्वत:च नाव आणि पत्ताही सांगता येत नाही. कुटुंबातील कोणीही अजूनही पुढे आलेले नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून, पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आणि वृद्ध महिलेला गंभीर अवस्थेत दर्शन नगर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. या रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले आहेत.
या घटनेवर लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृद्ध पालकांची जबाबदारी घेणे देखील आता एक ओझे झाले आहे का? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. पोलिसांनी वृद्धेच्या नातेवाईकांचा तपास सुरू केला आहे.