शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्श ही करू शकली नाही आग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:22 IST

चमत्काराची गोष्ट म्हणजे, ज्या अपघातात विमानातील सर्व साहित्य जळून खाक झाले, तेथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी आहे...

अहमदाबाद येथे गुरुवारी (१२ जून) दुपारी एअर इंडियाच्या विमानला भीषण अपघात झाला. यानंतर सुरू करण्यात आलेले बचावकार्यही जवळजवळ संपले आहे. या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या भीषण अपघातातून केवळ एकच व्यक्ती वाचू शकली. स्फोटानंतरच्या आगीत विमान आणि जवळफासच्या गोष्टींचे किती नुकसान झाले हे रेस्क्यूऑपरेशन दरम्यानच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, यावेळी बचाव पथकाला पवित्र भगवद्गीतेचीही एक प्रत सापडली. कदाचित कुणी प्रवासी हा ग्रंथ घेऊन प्रवास करत असावा. चमत्काराची गोष्ट म्हणजे, ज्या अपघातात विमानातील सर्व साहित्य जळून खाक झाले, तेथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी आहे. तेथे उपस्थित असलले लोक या घटनेला चमत्कार म्हणत आहेत. याला चमत्कार म्हणून पाहत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हडिओमध्ये एक व्यक्ती दुर्घटनास्थळावर आढळलेली एक भगवद्गीतेची प्रत आणि तिची पाने दाखवताना दिसत आहे. या भीषण अपघातात जवळपास पूर्णपणे जळालेल्या आणि तुकडे तुकडे झालेल्या विमानात भगवद्गीता सुखरूप आढळणे केवळ चमत्कारच मानले जात आहे. घटनास्थळी उपस्थित एक व्यक्ती भगवद्गीतेची पानं दाखवतानाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांच्या भावनांना स्पर्श केला आहे.

 ही दुर्घटना, एअर इंडियाचे लंडनला निघालेले AI-171 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही काही सेकंदांतच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाला धडकले. या विमानात एकूण २४२ लोक बसलेले होते. यांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रमेश विश्वशकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. तो आपत्कालीन दरवाजाजवळील सीट क्रमांक ११A वर बसला होता आणि वेळ असतानाच विमानातून उडी मारण्यात यशस्वी झाला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यूAccidentअपघात