VIDEO: '50 वर्षीय व्यक्ती म्हणतो थंडी वाजत नाही, 'जिन' आहेस का..?' ओवेसींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 16:55 IST2023-01-14T16:40:43+5:302023-01-14T16:55:22+5:30
Asaduddin Owaisi mocks Rahul Gandhi: 'ते म्हणतात, स्वतःचा जीव घेतला. मग भारत जोडो यात्रा काढणारी व्यक्ती कोण आहे?'

VIDEO: '50 वर्षीय व्यक्ती म्हणतो थंडी वाजत नाही, 'जिन' आहेस का..?' ओवेसींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली
हैदराबाद: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शेलक्या शब्दात खिल्ली उडवली. राहुल गांधींनी आत्महत्या केलीये का..? भारत जोडो यात्रेत चालणारा त्यांचा 'जिन' आहे का?' असे प्रश्न ओवेसींनी उपस्थित केले.
#WATCH via ANI Multimedia | “Tu kya hai phir? Djinn hai?” Owaisi’s sharp attack on RG’s “have killed Rahul Gandhi” remarkhttps://t.co/0Y0oNocctZ
— ANI (@ANI) January 14, 2023
असदुद्दीन ओवेसी हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'ही काँग्रेसची अवस्था आहे. एक 50 वर्षीय व्यक्ती म्हणतो की, त्यानं सर्दीला मारले, स्वतःला मारले. मग तू काय जिन्न आहेस का? स्वतःचा जीव घेतला असेल, तर भारत जोडो यात्रा काढणारी ही व्यक्ती कोण आहे? मी असं काही बोललो असतो, तर लोक म्हणाले असते, याला झटके येतात का...', असंही ओवेसी म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
नुकतंच एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींना भारत जोडो यात्रेमुळे त्यांची प्रतिमा बदलण्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले होते, 'राहुल गांधी तुमच्या मनात आहे. मी त्या राहुल गांधीला खूप पूर्वीच मारलंय. तुम्ही आता जी व्यक्ती पाहत आहात ती राहुल गांधी नाही.'